Gujrat Election 2022 : भाजपचा आक्रमक पवित्रा; मोदी-शहांसह 'हे' ४७ नेते मैदानात

Gujrat Election : आम आदमी पक्षाने गुजरातेत यंदा सारा जोर लावला आहे.
Narendra Modi, Amit Shah, Gujrat Election 2022 Latest News
Narendra Modi, Amit Shah, Gujrat Election 2022 Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : तब्बल २७ वर्षांपासून राखलेला 'गुजरातचा गड' राखण्यासाठीच नव्हे तर मजबूत करण्यासाठी सत्तारूढ भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही कसर बाकी

ठरवताना दिसत नसून दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या सर्व ९३ जागांवर आज ४७ स्टार प्रचारकांसह प्रमुख भाजप नेत्यांच्या प्रचारतोफा धडाडणार आहेत. राजकीय कोडवर्डनुसार 'कार्पेट बॉम्बिंग'धोरणांतर्गत अंतर्गत भाजपने दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी (ता.५ डिसेंबर) जोरदार निवडणूक प्रचार करण्याची रणनीती आखली आहे.'विजय संकल्प' हे नाव सार्थ करण्यासाठी भाजपची रणनीती काम करत आहे. (Narendra Modi, Amit Shah, Gujrat Election 2022 Latest News)

Narendra Modi, Amit Shah, Gujrat Election 2022 Latest News
Gujrat Election : अमित शहाच म्हणतात, गुजरातमध्ये आजही काँग्रेसचा जनाधार!

भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचा आपलाच विक्रम मोडण्याचे ‘टार्गेट'खुद्द पंतप्रधान मोदी यांनी दिल्याने गुजरात भाजप कार्यकर्त्यांतही चैतन्य आहे. मोदींनी सोमवारी चार सभांना संबोधित केले. २३ व २४ नोव्हेंबरला केवळ २ दिवसांत मोदी गुजरातेत तब्बल ८ सभांना संबोधित करणार आहेत. गुजरातसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी, नरेंद्रसिंह तोमर, अनुराग ठाकूर, व्ही के सिंह आदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांची सुसज्ज टीम, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा,पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रमुख तेजस्वी सूर्या आदी ४७ स्टार प्रचारक राज्यात जोरदार प्रचार करणार आहेत.

Narendra Modi, Amit Shah, Gujrat Election 2022 Latest News
Ajit Pawar : गुजरातवरून अजितदादांनी शिंदे-फडणवीसांना पुन्हा घेरले...

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. केजरीवाल वगळता भाजपला आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या अन्य पक्षीय नेत्यांना गुजारतेत जाण्यासाठी आता-आता मुहूर्त मिळालेला असताना भाजपने पहिल्या टप्प्यासाठी जाहीर सभांच्या प्रचाराच्या पुढे जाऊन बूथ पातळीवरील मजबूत मतदान यंत्रणेवर भर दिला आहे.सौराष्ट्र हा तसाही भाजपचा गड मानला जातो व यंदा मोरबी दुर्टनेचे सावट प्रचारावर पडू नये यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. मोदी यांनी रविवारी (ता.२० नोव्हेंबर) संध्याकाळी प्रचार संपताच भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत बंद दाराआड बैठक घेतली.

Narendra Modi, Amit Shah, Gujrat Election 2022 Latest News
Shivsena : चाळीस गावं काय ? ४० इंच जमीन देखील कर्नाटकला घेता येणार नाही..

गांधीनगर येथील भाजप राज्य मुख्यालय 'श्री कमलम'येथे झालेली बैठक पंतप्रधानांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात नव्हती.मात्र दिल्लीला येण्यापूर्वी मोदी अचानक श्रीकमलम येथे पोहोचले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील आणि गृहमंत्री हर्ष संघवी आदींच्या उपस्थितीबरोबरच मुख्यालयातील कर्मचाऱयांनाही मोदींनी आवर्जून बोलावून घेतले होते.यावेळी मोदींनी पक्षनेत्यांशी ‘अनौपचारीक संवाद' साधला असे भाजपकडून सांगण्यात आले.मोदी हे गुजराती अस्मितेचे राष्ट्रीय प्रतीक बनल्याने आगामी काळात त्यांच्या गुजरात दौऱ्या दरम्यान अशा अनौपचारीक संवादांची संख्या वाढत जाण्याची चिन्हे आहेत.

केजरीवाल व ओवैसी !

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने गुजरातेत यंदा सारा जोर लावला आहे. मात्र त्यांच्या प्रचाराची जास्त धास्ती कॉंग्रेसमध्ये असल्याचे भाजप नेते छातीठोकपणे सांगतात.केजरीवाल कॉंग्रेसची हक्काची मते हिसकावून घेतील व राहूल गांधी यांच्या यात्रेत मेधा पाटकर आदींना एन गुजरात निवडणुकीच्या काळात बोलावून कॉंग्रेसने आणखी नुकसान करून घेतले आहे,असे भाजप नेते सांगतात. एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी हेही यंदा गुजरातेत उतरले असून ओवैसी राज्यातील १३ जागांवर निवडणूक लढवत आहेत. अहमदाबादेत तर त्यांनी एका हिंदू उमेदवाराला तिकीट दिले आहे.तथापि ओवैसी रणांगणात आल्याने तर भाजपमध्ये एका प्रकारे ‘सुटकेचा निश्वास' म्हणावा, असे वातावरण जाणवत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in