मुख्यमंत्री पदाबाबत ओवैसींनी दिलेलं आव्हान योगींनी स्वीकारलं!

उत्तर प्रदेशात ओवैसींचा पक्ष 100 जागांवर उमेदवार उभे करणार आहे.
BJP workers accepts Asaduddin Owaisis challenge says Yogi Adityanath
BJP workers accepts Asaduddin Owaisis challenge says Yogi Adityanath

लखनऊ : उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपसह सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत विरोधकांची चांगली दमछाक करणाऱ्या आँल इंडिया मजजिल-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ही घोषणा करतानाच पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केलं आहे. (BJP workers accepts Asaduddin Owaisis challenge says Yogi Adityanath)

उत्तर प्रदेशात ओवैसींचा पक्ष 100 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. याबाबत पक्षाने ओवैसी यांचा एक व्हिडीओ प्रसारीत केला आहे. या व्हिडीओमार्फत त्यांनी योगींना खुलं आव्हान दिलं आहे. योगींना पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असं व्हिडीओत म्हटलं आहे. योगींनी हे आव्हान स्वीकारलं आहे. 

याविषयी बोलताना योगी म्हणाले, ओवैसी हे आपल्या देशातील मोठे नेते आहेत. त्यांनी भाजपला 2022 च्या निवडणुकीसाठी आव्हान दिलं असेल तर भाजपचे कार्यकर्ते त्यांचे आव्हान स्वीकारत आहेत. 2022 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपचेच सरकार येणार, यात कसलीच शंका नाही, असे योगी यांनी स्पष्ट केलं.  

दरम्यान, उत्तर प्रदेशात ओवैसी बहुजन समाज पक्षासोबत युती करणार असल्याची चर्चा होती, यानंतर ओवैसींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, 'आम्ही ओम प्रकाश राजभर साहेब' याच्या भागीदारी संकल्प मोर्चा' सोबत आहोत, आम्ही निवडणुका किंवा युतीसंबंधात इतर कोणत्याही पक्षाशी बोललो नाही.'

ओवैसी म्हणाले, 'मला उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात काही गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या आहेत, आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही 100 जागांवर आपले उमेदवार उभे करू, पक्षाने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.' बिहारमध्ये एआयएमआयएमने २० जागा लढविल्या होत्या. यातील पाच जागांवर त्यांना विजय मिळाला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com