अमित शहा यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू ; शहा यांचा समारंभ रद्द

अर्जून यांची आत्महत्या नसून ही हत्या आहे, असा आरोप त्यांच्या परिवाराने केला आहे.
अमित शहा यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू ; शहा यांचा समारंभ रद्द
Arjan Chaurasiasarkarnama

कोलकाता :गृहमंत्री अमित शहा (amit shah) हे सध्या पश्चिम बंगालच्या (west bengal) दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्यांचा शेवटच्या दिवशी भाजप (bjp) युवा नेत्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात तणाव वाढला आहे. अर्जून चौरसिया (वय २६) असे या नेत्याचं नाव आहे. ते काशीपूर-बेलगछिया भाजप युवा मोर्चोचे उपाध्यक्ष होते.

काशीपूर परिसरात एका रेल्वे क्वार्टरमध्ये आज सकाळी अर्जून चौरसिया (Arjan Chaurasia) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अर्जून यांची आत्महत्या नसून ही हत्या आहे, असा आरोप त्यांच्या परिवाराने केला आहे.

अर्जून यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पण पाय जमिनीवर असलेल्या स्थितीत होता, यामुळे त्यांची हत्या केली असल्याचा आरोप त्यांची बहीण सुनीता चौरसिया यांनी केला आहे. याप्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Arjan Chaurasia
पहिल्यांदाच मिळणार काश्मिरी पंडितांना आरक्षण ; परिसीमन आयोगाची शिफारस

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुक निकालानंतर अर्जून यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे ते काही दिवसापासून घरापासून दूर अज्ञानवासात होते. न्यायालयाच्या आदेशानंतर ते काही दिवसापूर्वी घरी आले होते. त्यानंतरही त्यांना धमकी येणं सुरुच होतं. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

या घटनेनंतर अमित शहा यांचा कोलकोता येथे होणारा स्वागत समारंभ रद्द करण्यात आला आहे. अमित शहा हे मृत अर्जून चौरसिया यांच्या कुंटुबियांची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. घटनास्थळी पाच तास मृतदेह पडून होता. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. येथे तणावपूर्ण शांतता आहे.

Arjan Chaurasia
मशिदींवरील भोंग्यांवरुन उच्च न्यायालयाने पुन्हा कान टोचले ; याचिका रद्द

काल अमित शहा यांच्या हस्ते सतलुज, नर्मदा, कावेरी, गंगा, साबरमती, कृष्णा परिसरातील दुर्गम भागात असलेल्या बीएसएफच्या आउट पोस्टचे उद्धघाटन झाले. बोट अॅम्बुलन्सच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे.

सिलीगुडी येथील रेल्वेच्या मैदानावर काल सांयकाळी त्यांची जाहीर सभा झाली. आज (शुक्रवारी) सकाळी कूचबिहार जिल्ह्यात बीएसएफच्या जवानांशी अमित शहा यांनी संवाद साधला. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीनंतर अमित शहा यांचा हा पहिला दौरा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.