BJP First Win In Deoband: उत्तर प्रदेशात मुस्लिम बहुल क्षेत्रात १४० वर्षानंतर कमळ फुललं ; पहिले हिंदू नगराध्यक्ष..

Deoband Municipality BJP Win: येथे जगप्रसिद्ध मुस्लिम शिक्षण संस्था दारुल उलून आहे.
Deoband Municipality bjp win news
Deoband Municipality bjp win news Sarkarnama

Deoband Municipality BJP Win News: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकारने उत्तरप्रदेशातील अनेक मिथकांना खोटं ठरवलं आहे. (bjp win first time after independence in deoband non muslim elected in 140 years)

भाजपा ज्या ठिकाणी विजयाची कल्पना करु शकत नव्हती, त्याठिकाणी भाजपने विजय मिळवला आहे. रामपुर विधानसभेनंतर आता सहानपुर येथील देवबंद नगरपालिकेत भाजपने स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवात नवं रेकाँर्ड स्थापन केलं आहे.

Deoband Municipality bjp win news
Raj Thackeray On BJP : 'निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारे..' ; राज ठाकरेंनी घेतला शेलारांचा खरपूस समाचार!

विपिन गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात पहिल्यांदा देवबंद नगरपालिकेत कमळ फुललं आहे. १४० वर्षांनंतर येथे पहिल्यांदा हिंदू (गैर-मुस्लिम) येथे निवडणूक जिंकण्यास यशस्वी ठरले आहेत.

हा परिसर मुस्लिम बहुल क्षेत्र आहे. येथे जगप्रसिद्ध मुस्लिम शिक्षण संस्था दारुल उलून आहे. येथील नगरपालिकेत आतापर्यत मुस्लिमांचे वर्चस्व होते.

Deoband Municipality bjp win news
Karnataka Election : कर्नाटकात जिंकणारे सर्व मुस्लिम आमदार काँग्रेसचे; आरक्षणाचा मुद्दा ठरलं कारण ?

भाजपाचे विपिन गर्ग यांनी ४ हजार ७०० मतांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार जहीर फातिमा यांचा पराभव केला. विपिन गर्ग यांना २२ हजार ६५९ मते मिळाली आहेत. तर सपाच्या जहीर फातिमा यांना १७ हजार ९५९ मते मिळाली आहेत.

बसपाचे उमेदार जमालुद्दीन अंसारी यांनी ७ हजार, मते मिळाली आहेत, ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे उमेदवार नौशाद कुरैशी यांनी फक्त ४८३ मते मिळाली आहेत. इंग्रजांनी देवबंद नगरपालिकेची स्थापना मे १८८४ मध्ये केली होती. तेव्हापासून नगराध्यक्षपदी मुस्लिमच निवडून येत होते. त्यानंतर पहिल्या विपिन गर्ग हे पहिले हिंदू नगराध्यक्ष झाले आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in