एक्झिट पोल : आसाममध्ये भाजप सत्ता ताब्यात ठेवणार; काँग्रेसच्या जागा दुप्पट होणार

देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले आहेत.
bjp will retain assam and congress will get more seats predicts exit polls
bjp will retain assam and congress will get more seats predicts exit polls

नवी दिल्ली : देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आसाम बहुमतासह भाजप सत्ता ताब्यात ठेवेल, असा अंदाज  एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याचवेळी काँग्रेस आघाडीच्या जागांमध्ये मोठी वाढ होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

'एनडीटीव्ही'ने सर्व एक्झिट पोलची सरासरी काढून अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, आसाममध्ये भाजपला 76 जागा मिळतील. काँग्रेसला 49 जागा आणि इतरांना 1 जागा मिळेल. यामुळे आसाममध्ये भाजप सत्ता ताब्यात ठेवेल. 

आसाममध्ये 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला होता. भाजपला 126 पैकी 86 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 26 आणि इतर पक्षांना 14 जागा मिळाल्या. आसाममध्ये सत्ता टिकविण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला होता. 'सीएए'चा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा ठरला होता. 

ओपिनियन पोलमध्येही भाजपलाच होती पसंती 
टाईम्स नाऊ आणि सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित यूपीए यांच्यात आसाममध्ये काँटे की टक्कर होईल. यात एनडीएला काठावरचे बहुमत मिळेल. विधानसभेच्या एकूण 126 जागांपैकी एनडीएला 67 जागा मिळतील तर यूपीएला 57 जागा मिळतील. मागील विधानसभा निवडणुकीत एनडीएला 89 जागा तर यूपीएला केवळ 26 जागा मिळाल्या होत्या. आता एनडीएच्या जागा कमी होऊन यूपीएच्या जागा वाढतील. यूपीएमध्ये काँग्रेस पक्षाने बद्रुद्दीन अजमल यांचा एआययूडीएफ, बोडो पीपल्स फ्रंट आणि तीन डाव्या पक्षांनी सोबत घेतले होते. एनडीएमध्ये भाजपसोबत आसाम गण परिषदेचा समावेश होता. मुख्यमंत्रिपदासाठी सर्वांनंद सोनोवाल यांच्या  नावाला सर्वाधिक पसंती मिळाली होती. 

निवडणूक आयोगाकडून चारे राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. यात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत झाल्या आहेत. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला  होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com