'काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र आले तरी भाजप हरणार नाही'

कमकुवत विरोधकांच्या विरोधात ३५ वर्षे सत्तेत राहून देशाची सेवा करू. अमित शहांनी (Amit Shah) सांगितला ३००प्लस चा फॉर्म्यला.
'काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र आले तरी भाजप  हरणार नाही'

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh0 दौऱ्यावर आहेत. युपीचे २०२२ मधील आगामी लोकसभा निवडणूकाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) आणि भाजप नेत्यांसोबत अमित शहा (Central Home Minister Amit Shah) यांनी बैठक घेतली. बैठकीत मुख्यमंत्री योगी यांचे कौतुक केले. सर्व जागांच्या प्रभारींसोबत झालेल्या बैठकीत अमित शहा यांनी विरोधकांना थेट आव्हानच केले आहे.

''काँग्रेस (Congress) , समाजवादी पार्टी (Samajvadi Party) आणि बहुजन समाजवादी पार्टी (Bahujan Samajwadi Party) एकत्र आले तरी भाजप निवडणूक हरणार नाही. 2022 च्या यूपी निवडणुकीचे निकाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण असतील. कारण दिल्लीतील विजयाचा रस्ता याच राज्यातून जातो. कमकुवत विरोधकांच्या विरोधात ३५ वर्षे सत्तेत राहून देशाची सेवा करू. विरोधकांकडे कोणतीही योजना नाही. लोकांनी आम्हाला स्वीकारले आहे. उत्तम कृती आराखडा, भक्कम संघटन आणि व्यवस्थापन यामुळे २०२२ च्या विधानसभा निवडणुका आम्ही जिंकू, असा विश्वासही यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केला.

'काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र आले तरी भाजप  हरणार नाही'
अमरावतीत बंदला हिंसक वळण, परिस्थिती नियंत्रणाबाहेर

पूर्वांचल यूपीचा विजय निश्चित करेल. आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही विधानसभा प्रभारी आणि संघटनेशी संबंधित लोकांना तिकीट मिळणार नाही. तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही आत्ताच सांगू शकता. आम्ही केवळ सरकार बनवण्यासाठी आलो नाही, असा संदेश जनतेपर्यंत गेला पाहिजे. भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आम्ही सत्तेसाठी लढत आहोत. अमित शहा यांनी मिशन ३०० प्लसची योजनाही सांगितली, तसेच आमची संघटना मजबूत आहे, आम्ही हे लक्ष्य गाठू, असा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.

गृहमंत्री म्हणाले की, 2014 मध्ये सरकारविरोधातील जनतेच्या नाराजीमुळे आम्ही सत्तेवर आलो. 2017 मध्ये आम्ही इतर पक्षांच्या तगड्या नेत्यांना सोबत घेतले आणि त्यामुळे आम्ही जिंकलो. 2019 मध्ये, सर्व कमकुवत पक्ष एकत्र आले, तरीही आम्ही आमच्या मजबूत कृती योजना आणि व्यवस्थापनामुळे जिंकलो. कलम 370 हटवण्याची आणि राम मंदिर बांधण्याची जी आश्वासने आम्ही जनतेला दिली होती ती पूर्ण केली.

तर 2013 मध्ये निवडणूक प्रभारी म्हणून मी आलो होतो, तेव्हा 2014 मध्ये असा विजय मिळवायचा आहे की, त्यामुळे 2017 चा पाया रचला जाईल, असे मी म्हटले होते. केंद्र आणि राज्य सरकारने असे काम केले आहे की, आता 2022 आणि 2024 चा पाया रचला गेला आहे. आपण सर्वांनी केलेल्या कामावरच पुढे जायचे आहे. यूपीची निवडणूक ही युग बदलाची निवडणूक आहे. त्यातून देशाची दशा आणि दिशा ठरेल. आमच्या कल्पनेचा भारत घडवण्यासाठी आम्ही सरकार स्थापन केल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होईल. यात पक्षाचे कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतील. विजयाचे श्रेय प्रत्येक कार्यकर्त्याला जाईल. कार्यकर्त्यांना सहकार्य करण्यासाठी आलो असल्याचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. काम फक्त कामगारांनाच करायचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com