मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा 'सेवा पंधरवडा' जावडेकरांवर महत्त्वाची जबाबदारी

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा वाढदिवसा निमित्त (१७ सप्टेंबर) विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून देशभरात साजरा करण्याची जय्यत तयारी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने (BJP) केली आहे. विशेषतः आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल या मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांवर यंदा विशेष भर राहणार आहे.

यानिमित्त 'सेवा पंधरवडा' कार्यक्रमात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) असे १५ दिवस भाजपतर्फे देशभरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतच्या ८ सदस्यीय राष्ट्रीय समितिचे नेतत्व करणारे राष्ट्रीय भाजप महासचिव अरुण सिंह यांनी देशभरातील भाजप शाखांना प्रदेशाध्यक्षांच्या नावे याबाबत एक पत्र लिहिले आहे.

मोदी यांच्या वाढदिवसाचे नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर देखरेख ठेवणे, ठरविलेले उपक्रम 'नमो ॲप' वर डाऊनलोड केले जातात की नाही, हे पाहण्यासाठी भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. 'व्होकल फॉर लोकल'च्या माध्यमातून स्वावलंबी भारताच्या उपक्रमाला चालना द्यावी, असे भाजपने निर्देशांमध्ये म्हटले आहे. पक्षाच्या प्रत्येक जिल्हा व विभागीय मुख्य पदाधिकाऱ्यांनी स्थानिक उत्पादने खरेदी करून त्याचा व्हिडिओ नमो अॅपवर अपलोड करावा.

Narendra Modi
सुभाष देशमुखांच्या चिरंजीवावर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी!

विशेषतः खादीच्या विक्रीत चौपट वाढ झाल्यामुळे खादी विक्री केंद्रातून खादीच्या वस्तूंची खरेदी करून त्याचे फोटो अपलोड करावेत. याबाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दहा जिल्हाध्यक्षांचा नंतर देशपातळीवर गौरव करण्यात येणार आहे. मोदी ॲट २०- सपने हुए साकार या पुस्तकाची देशभरात प्रसिध्दीही करण्यात येणार आहे. या संकल्पनेची जबाबदारी असलेले माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्यावर, भाजपचे पुढचे 'टार्गेट' असलेल्या दक्षिणेकडील तेलंगणासह ४ राज्यांत या पुस्तकाची दणकेबाज प्रसिध्दी करण्याची जबाबदारी दिली आहे.

अरूण सिंह यांच्या पत्रात नमूद केलेल्या अन्य सूचने प्रमाणे- मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या कोट्यवधी लाभार्थ्यांच्या शुभेच्छा संदेश पाठवावेत आणि त्यांची संख्या नमो अॅपवर अपलोड करावी. मोदींचे व्यक्तित्व व कार्य यावर देशभरात राज्य आणि जिल्हा स्तरावर चित्र व ध्वनीचित्र प्रदर्शने आयोजित करावीत. प्रत्येक जिल्हा-शक्यतो तालुक्यात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिरे, कृत्रिम अवयव व उपकरणे वाटप आदी उपक्रम राबवावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कोरोना लसीकरण मोहिमेलाही गती देण्यास सांगितले आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पाणी हेच जीवन आदी मोहीमाही या काळात राबवाव्यात अशाही असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, या सेवा पंधरवड्यात पंतप्रधान मोदींचे व्यक्तिमत्व, व्हीजन, दूरदृष्टीने व योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची क्षमता, मोदी सरकारच्या योजना, धोरणे आणि उपलब्धी यावर चर्चा करण्यासाठी बुध्दिवादी वर्गासह विचारवंतांच्या परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत.

Narendra Modi
दिल्लीत 'आप' सरकार कायम; विश्वासदर्शक ठराव जिंकला...

२५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त बूथ स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला बापूंची तत्त्वे, स्वदेशी, खादी, साधेपणा आणि स्वच्छता याविषयीही भाजपच्या वतीने विशेष मोहीमा राबविण्यात येणार आहेत. मोदी वाढदिवस कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रत्येक राज्यात पाच सदस्यीय तर जिल्हास्तरांवर तीन सदस्यीय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. सर्व खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनाही या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in