भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा निर्धार ; बंगालच्या तालिबानीकरणाविरूद्ध लढणार

सुकांता मजुमदार (Sukanta Mujumdar) यांनी ''राज्याच्या तालिबानीकरणाविरुद्ध लढू,'' असा निर्धार व्यक्त केला.
Sukanta Mujumdar
Sukanta Mujumdarsarkarnama

नवी दिल्ली : भाजपने दिलीप घोष (Dilip Ghosh) यांच्याऐवजी पश्चिम बंगालमधील बालूरघाटचे खासदार सुकांता मजुमदार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपविली आहेत. घोष यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे नवे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार (Sukanta Mujumdar) यांनी ''राज्याच्या तालिबानीकरणाविरुद्ध लढू,'' असा निर्धार व्यक्त केला.

भाजपने दिलीप घोष यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. त्यांच्याजागी खासदार डॉ. सुकांत मजूमदार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर घोष यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आलं आहे

घोष म्हणाले की, गेल्या काही दिवसांत भाजपमधून होणाऱ्या पक्षांतराला फारसे महत्त्व देण्यास नकार देत दिलीप घोष म्हणाले, की पक्षाच्या विचारधारेला एकनिष्ठ असणारे कधीही पक्ष सोडून जाऊ शकत नाहीत. पक्षश्रेष्ठींच्या सहकार्याने मी पश्चिम बंगालच्या तालिबानीकरणाविरुद्ध लढाई सुरूच ठेवेन.

Sukanta Mujumdar
राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

''आमच्यासाठी भाजप कार्यकर्तेच खरी संपत्ती आहेत. आम्ही जर काही चुका केल्या असतील तर त्या दुरुस्त करू. ज्यांना असे वाटते की, आपण भाजपमधून बाहेर पडून पक्षाचे नुकसान करू शकतो, ते चुकीचे आहेत. येत्या काळात भाजप विजयी होईल. पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ असणारे कधीही पक्ष सोडू शकत नाहीत,'' असे घोष म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com