
bjp News : यंदा देशात होणार्या नऊ राज्यातील निवडणुका, पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक आदी विषयावर रणनीती ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून (सोमवार) दिल्ली येथे सुरू होत आहे. (BJP Executive Meeting News)
नऊ राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काय उपाय योजना करता येईल, हा प्रमुख मुद्या या बैठकीत आहे. कुठल्याही परिस्थिती विधानसभा निवडणुका जिंकणारच, यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ३५ केंद्रीय मंत्री, १२ मुख्यमंत्री, ५ उपमुख्यमंत्र्यांसह साडेतीनशे कार्यकारीणीचे सदस्य बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
सर्वसामान्य जनतेची मागणी पूर्ण करताना त्यांना भावनात्मक पद्धतीन पक्षाशी कसे जोडता येईल, यासाठी भाजपमध्ये विचारविनिमय सुरु आहे. मुस्लिम महिलांना सामाजिक सुरक्षा कशा पद्धतीने देता येईल, याची चर्चा बैठकीत होणार आहे.
गुजरात निवडणुकीनंतर पहिल्यांदाच कार्यकारीणीची बैठक होत आहे, या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. संसद मार्गावर कार्यकर्ते त्यांचे स्वागत करणार आहेत, त्यानंतर एनडीएमसी सेंटरपर्यंत एका रॅलीच्या माध्यमातून मोदींचे स्वागत करण्यात येणार आहे.
या विषयावर फोकस
सेवा, संघटन आणि समर्पण,विश्व गुरु भारत, सर्वप्रथम सुशासन, मुस्लिम महिलांना सामाजिक सुरक्षा, वंचितांचे सशक्तीकरण, सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीस या विषयावर या कार्यकारीणीच्या बैठकीत चर्चा होणार आहे, असे भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी माध्यमांना सांगितले.
'विश्व गुरु भारत'
युक्रेन-रशियाच्या युद्धात भारताने केलेल्या आँपरेशन गंगा मोहीमेचा आलेले यश, दुसऱ्या देशातील विद्यार्थ्यांना केलेली मदत, अन्य देशांना कोरोना लस देणे, वैश्विक संकटाचा सामना करीत असताना भारत जगातील पाचवी महासत्ता म्हणून ओळखला जात आहे. या माध्यमातून 'विश्व गुरु भारत'ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.