Shiv Sena : अडीच वर्षांचा शब्द दिला नव्हता ; अजितकुमार मिश्रा यांचा ठाकरेंवर निशाणा

AjitKumar Mishra : शिवसेनेतील गट आमच्याबरोबर आल्यानंतर आम्हाला सहज मुख्यमंत्रिपद मिळाले असते. परंतु, आम्ही त्यांना मुख्यमंत्रिपद दिले
AjitKumar Mishra
AjitKumar Mishrasarkarnama

रत्नागिरी: भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजितकुमार मिश्रा (AjitKumar Mishra) हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज (शुक्रवारी) त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते रत्नागिरी येथे बोलत होते. (AjitKumar Mishra news update)

अजितकुमार मिश्रा म्हणाले, "बिहारमध्ये जी काही राजकीय उलथापालथ झाली, त्याचा कोणताही परिणाम अन्य राज्यात होणार नाही. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट शिवसेनेतील गट आमच्याबरोबर आल्यानंतर आम्हाला सहज मुख्यमंत्रिपद मिळाले असते. परंतु, आम्ही त्यांना मुख्यमंत्रिपद दिले,"

‘‘राज्यात २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती म्हणून एकत्र निवडणुका लढलो. मात्र, त्यानंतर अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने आम्हाला धोका देत पाठीत खंजीर खुपसला. विरोधात लढलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी केली. अडीच वर्षांचा शब्द आम्ही दिला नव्हता. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे स्वार्थासाठी बोलत आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले म्हणजे ते काही देव नाहीत,’’ अशी टीका मिश्रा यांनी केली.

‘‘रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ज्या जिल्ह्यात भाजपचा खासदार नाही, अशा जिल्ह्यांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना दिली आहे. या लोकसभा मतदारसंघात अपेक्षित विकास झालेला दिसत नाही. भविष्यात या मतदारसंघामध्ये भाजपचा खासदार असेल. भाजप कोणत्याही छोट्या पक्षाला संपविण्याचा प्रयत्न करीत नाही.’’ असे मिश्रा म्हणाले.

AjitKumar Mishra
Supreme Court : निवडणुका EVM वर की, बॅलेट पेपरवर ? ; न्यायालयानं स्पष्टचं सांगितलं..

ईडीच्या कारवाईबाबत मिश्रा म्हणाले, "गेल्या आठ वर्षांमध्ये बेहिशेबी संपत्ती जमविणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख कोटीपेक्षाही जास्त संपत्ती मिळाली आहे. हा बेकायदा पैसा आला कुठून. त्यामुळे कोणावरही जाणूनबुजून कारवाई केली जात नाही," भाजपमधील एकाही व्यक्तीवर ‘ईडी’ची कारवाई का होत नाही, या प्रश्‍नाला मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com