मनीष तिवारींसह अनेक काँग्रेस नेते पक्षत्यागाच्या तयारीत; भाजपच्या गोटात चर्चा

मनीष तिवारी यांच्यासारखे अनेक नाराज नेते काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा भाजपच्या गोटामधून ऐकायला मिळत आहे.
मनीष तिवारींसह अनेक काँग्रेस नेते पक्षत्यागाच्या तयारीत; भाजपच्या गोटात चर्चा
Manmohan Singh and Manish Tewari Sarkarnama

नवी दिल्ली : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर न देणे हा तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या टोकाच्या कमकुवतपणाचे द्योतक होते, असा घरचा आहेर काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते खासदार मनीष तिवारी (Manish Tewari) यांनी आपल्या ‘10 फ्लॅश पॉईंट, 20 वर्षे‘ नावाच्या ताज्या पुस्तकात दिला आहे. यावरून आता राजकीय वादंग सुरू झाला असून, भाजपला (BJP) आयतेच कोलित हाती मिळाले आहे. दरम्यान, तिवारी यांच्यासारखे अनेक नाराज नेते काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा भाजपच्या गोटामधून ऐकायला मिळत आहे.

मनीष तिवारी हे काँग्रेसमधील जी-23 गटाचे सदस्य आहेत. पंजाब निवडणुकीच्या तोंडावर तिवारींसह अनेक काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा नवा पक्ष अथवा आम आदमी पक्षाच्या संपर्कात जाण्याच्या हालचाली करत असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. भाजप नेत्यांच्या मते, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल आदींप्रमाणेच तिवारी यांची मते काँग्रेसच्या अपयशाचा नवी कबुली आहे. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. आता 2024 जवळ येत जाईल तसे तिवारी यांच्याप्रमाणे अनेक नेते स्वपक्षाच्या नेतृत्वाचे वाभाडे काढतील, असाही भाजप नेत्यांचा होरा आहे.

Manmohan Singh and Manish Tewari
आर्यनची अटक महागात; मलिक यांच्यानंतर आता शाहरूख आणणार वानखेडेंना अडचणीत

तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकात डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या धोरणाचे वाभाडे काढल्याने भाजपच्या हाती नवे कोलीत मिळाले आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकात काहीही चुकीचे लिहिलेले नाही. यूपीए सरकारला देशाच्या अखंडतेची पर्वा नव्हती, हे नव्याने पुढे आले आहे. या पुस्तकात जे लिहिले त्यावर सोनिया गांधी व राहुल गांधी आपले मौन सोडतील का व कधी, हा खरा प्रश्न आहे. आमचे लष्कर तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे मुंबई हल्ला करणाऱया पाकला धडा शिकवण्याची त्या देशावर कठोर कारवाई करण्याची परवानगी वारंवार मागत होते. पण ती का दिली नाही हे सोनिया गांधी सांगतील का?

Manmohan Singh and Manish Tewari
मुंबई पोलिसांनी थेट माजी प्रमुखांच्या घरावरच चिकटवला न्यायालयाचा आदेश!

भाटिया म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर यूपीए सरकार बेपर्वा होते, हे भाजपने अनेकदा दाखवून दिले आहे. संयम म्हणजे सशक्तपणाची खूण नाही तर तो कमकुवतपणा आहे. काँग्रेसने पाकिस्तानबाबत हे धोरण स्वातंत्र्यानंतर वारंवार दाखवले आहे. या पक्षाला देशाच्या अखंडतेची काळजी नव्हती व नाही हे प्रत्येक भारतीय पाहात होता. यूपीए सरकारने राष्ट्रीय सुरक्षेलाही पणाला लावले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in