प्रवक्त्यांमुळेच भाजप अडचणीत; दोघांना पक्षातून तडकाफडकी केलं निलंबित

प्रेषित महंमद पैगंबर व इस्लाम धर्म यांच्याबद्दल कथितरीत्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपने हात झटकले आहेत.
Naveen Kumar Jindal, Nupur Sharma suspended from BJP
Naveen Kumar Jindal, Nupur Sharma suspended from BJPSarkaranama

नवी दिल्ली : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यामुळे अडचणीत आलेल्या भाजनने मोठं पाऊल उचललं आहे. प्रेषित महंमद पैगंबर व इस्लाम धर्म यांच्याबद्दल कथितरीत्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपने हात झटकले असून दोघांनाही पक्षातून निलंबित केले आहे. त्याआधी भाजपने निवेदन प्रसिध्दीस भाजप कोणत्याही धर्माचा किंवा व्यक्तीचा अपमान निंदनीय असल्याचे स्पष्ट केले आहे. (BJP Latest Marathi News)

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसेच भाजपचे प्रवक्ते नवीन कुमार जिंदाल यांनीही काही दिवसांपूर्वी वादग्रस्त ट्विट केलं होतं. (BJP suspends Nupur Sharma and Naveen Jindal from party)

Naveen Kumar Jindal, Nupur Sharma suspended from BJP
चूक करणाऱ्याला निलंबित करा! अजितदादांनी मनिषा म्हैसकरांसह अधिकाऱ्यांना स्टेजवरच झापलं!

दोन्ही नेत्यांमुळे वाद निर्माण झाला होता. शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक नेत्यांची त्यांची पाठराखणही केली होती. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातच मागील काही दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीसह इतर मशिदींच्या जागेवरून वाद सुरू आहे. त्यामुळे देशातील धार्मिक वातावरण भाजपकडून बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

शर्मा आणि जिंदाल यांच्यामुळे या वादात भर पडली होती. याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गंभीरपणे दखल घेतल्याचे समजते. त्यामुळे पक्षाने दोघांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी पक्षाकडून निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंह यांनी याबाबतचे निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.

Naveen Kumar Jindal, Nupur Sharma suspended from BJP
तानाजी सावंत यांच्या वाहनाचा पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात

काय म्हटले आहे निवदेनात?

भारताच्या हजार वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म वाढला आहे. भाजपकडून सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. कोणताही धर्म किंवा धार्मिक व्यक्तींचा अपमान निंदनीय आहे. कोणत्याही धर्माचा अपमान करणाऱ्या विचारधारेविरोधात पक्ष आहे. भाजपकडून अशा कोणत्याही विचारधारेचा प्रचार केला जात नाही, असं निवेदनात स्पष्ट करून नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्या वक्तव्यांपासून हात झटकले आहेत.

भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या पसंतीच्या धर्माचा अभ्यास करण्याचा अधिकार देते. संपूर्ण देश स्वातंत्र्याची 75 व्या वर्षाचा जल्लोष करत असताना आम्ही भारताला एक महान देश बनविण्यासाठी कटिबध्द आहोत. जिथे सर्वजण समान असती, प्रत्येकाचा सन्मान होईल, जिथे सर्व जण भारताची एकता आणि अखंडतेसाठी कटिबध्द असतील, जिथे सर्वांना विकासाचा फायदा होईल, असंही पक्षाकडून निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com