भाजपला मतदान कराल तर परिणामांना तयार राहा : तृणमूल आमदाराची उघड धमकी

west bengal| Politics| पश्चिम बंगालमध्येबीरभूम हिंसाचारावरून राजकारण तापले आहे.
west bengal| Politics|
west bengal| Politics|

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) राजकीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे. बीरभूम हिंसाचारावरून राजकारण तापले आहे. यावरुन भाजपने (BJP) सत्ताधारी तृणमुल कॉंग्रेसला (Trinmool congress) धारेवर धरले असतानाच तृणमूल काँग्रेसचे आमदार नरेन चक्रवर्ती यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते भाजपच्या समर्थकांना धमकावताना दिसत आहेत. भाजपला मतदान कराल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी आमदार नरेन चक्रवर्ती देताना दिसत आहेत.

बंगालमधील एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. पोटनिवडणूकांच्या पार्श्वभुमीवर नरेन चक्रवर्ती यांनी सोमवारी आसनसोल विधानसभा मतदारसंघात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार नरेन चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत मतदारांना खुली धमकी देताना दिसत आहेत. "कट्टर भाजप समर्थकांना "घरी राहा" आणि मतदान करू नका,'' असे सांगत आहेत.

west bengal| Politics|
दरेकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी टळली.. पण दोन आठवडे तरी त्यांना टेन्शन नाही..

'जे भाजपचे कट्टर समर्थक आहेत त्यांना घाबरवा आणि धमकावा, त्यांना सांगा की ते मतदानाला गेले नाहीत तर ते आमच्या समर्थनात आहेत असे आम्ही समजू. जर त्यांनी भाजपला मतदान केले नाही तर ते बंगालमध्ये आपला व्यवसाय आणि नोकरी करु शकतील,अशा सुचनाही त्यांनी टीएमसी समर्थकांना दिल्या आहेत. पण जर त्यांनी भाजपला मतदान केले तर आम्ही बघून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी भाजप भाजप नेते जितेंद्र तिवारी केली आहे. लोकांनी भाजपला मतदान केले तर टीएमसीचा पराभव निश्चित आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी लोकांना अशी धमकी दिली असावी. असेही नरेन चक्रवर्ती हे अनुब्रत मंडल यांचे शिष्य आहेत. अनुब्रत मंडल काही दिवसांतच तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. पण जर ते जर अशाच धमक्या देत राहिले तर त्यांना तरुंगात लुडो खेळण्यासाठी साथीदारांची आवश्यकता असेल, असा अप्रत्यक्ष इशाराही तिवारी यांनी चक्रवर्तींना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com