मुख्यमंत्री ठाकरेंवर कारवाई करा ; भाजप शिष्टमंडळासह सोमय्या दिल्ली दरबारी

उद्धव ठाकरे जगाला मूर्ख समजतात. शिवसेनेचे (Shivsena) गुंड आमच्यावर हल्ला करतात, धमक्या देतात.
Kirit Somaiya, Uddhav Thackeray
Kirit Somaiya, Uddhav Thackeraysarkarnama

नवी दिल्ली : शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तक्रार करण्यासाठी भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपचे शिष्टमंडळ (BJP Delegation)आज सकाळी दिल्ली येथे पोहचले आहे. ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्ली विमानतळावर उतरताच आज पुन्हा सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर आगपाखड केले.

''शिवसेनेचे लोक जनतेच्या घरात घुसतात. उद्धव ठाकरे जगाला मूर्ख समजतात. शिवसेनेचे (Shivsena) गुंड आमच्यावर हल्ला करतात, धमक्या देतात, पण आम्ही त्यांच्यासमोर नमणार नाही ,''असे सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. आज सकाळी साडेदहा वाजता नॉर्थ ब्लॉकमध्ये ही बैठक होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय गृहसचिव अजय कुमार (Ajay Kumar) भल्ला यांची ते भेट घेणार आहे.

Kirit Somaiya, Uddhav Thackeray
कर्नाटकात हिजाबनंतर आता नवीन वादाला तोंड फुटलं ; हिंदू संघटना आक्रमक

खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी सोमय्या हे खार पोलीस ठाण्यात आले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बूट आणि पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या.हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी मुंबई पोलीसांवर टीका केली आहे.

खार पोलीस ठाण्यामधून किरीट सोमय्या बाहेर पडत असताना अनेक लोक मोबाईल आणि कॅमेऱ्यातून व्हिडिओ बनवत होते. सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पोलीस या सर्व व्हिडिओंचा तपास करीत आहेत.

Kirit Somaiya, Uddhav Thackeray
राजद्रोहाचा गुन्हा दाखल ; रवी राणा तळोजा तर नवनीत राणा भायखळा कारागृहात..

"पोलिसांनी सीएम उद्धव ठाकरेंच्या गुंडांना पोलीस स्टेशनबाहेर जमू दिलं. मी बाहेर आल्यावर त्या गुंडांनी माझ्यावर दगडफेक केली. गाडीच्या काचा फोडल्या. यात मी जखमी झालो असून पोलिसांच्या उपस्थितीतचं मला मारहाण केली." असे टि्वट काल सोमय्यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com