विरोधकांचा सुफडा साफ करत भाजपचा महापालिकेत दणदणीत विजय

आसाममधील गुवाहाटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत पुन्हा सत्ता काबीज केली आहे.
विरोधकांचा सुफडा साफ करत भाजपचा महापालिकेत दणदणीत विजय
BJP Flags Sarkarnama

गुवाहाटी : आसाममधील गुवाहाटी महानगरपालिकेच्या (Guwahati Municipal Corporation) निवडणुकीत भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळवत पुन्हा सत्ता काबीज केली आहे. एकूण 60 जागांपैकी तब्बल 58 जागांवर भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) भोपळाही फोडता आली नाही. तर 'आप'ने महापालिकेच चंचुप्रवेश मिळवला असून एका जागेवर विजय मिळाला आहे.

निवडणुकीत (Election) याआधीच तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे 22 एप्रिल रोजी 57 जागांसाठी मतदान झाले. रविवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरूवातीपासूनच भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. पहिल्या दोन तासांतच महापालिकेचं चित्र स्पष्ट झालं. काही दिवसांपूर्वीच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपने विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर आता गुवाहाटी महापालिकेवरही पुन्हा कब्जा केला आहे.

BJP Flags
अनुभवी नेत्यांनी चुकेल त्यांचे कान धरले पाहिजेत! पवारांसमोरच राणेंनी केली तक्रार

निवडणुकीत भाजपनं आसाम गण परिषदेसोबत आघाडी केली होती. या निवडणुकीत भाजपला 57 पैकी 49 जागांवर तर परिषदेला सहा जागांवर विजय मिळाला. आपने (AAP) पहिल्यांदाच या निवणुकीत उमेदवार उतरवले होते त्यांना एक जागा मिळाली असून आसाम जातीय परिषदेला एक जागा मिळाली आहे. काँग्रेसवर नामुष्की ओढवली असून खातंही खोलता आलेले नाही. या विजयानंतर मुख्यमंत्री हिंमता बिसवा सरमा यांनी आनंद व्यक्त केला.

सरमा म्हणाले, गुवाहाटी महापालिकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल आसामच्या जनतेसमोर मी नतमस्तक होत आहे. या विजयामुळे जनतेने आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विकासाच्या मार्गावर पुन्हा एका मतदारांनी शिक्कामोर्तब केलं आहे, असं सरमा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.