प्रियंका गांधी आहे की राधे मॉँ ; संबित पात्रा यांचा हल्लाबोल

प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांच्या अचानक राजकारणात सक्रीय होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (sambit patras) यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
priyanka gandhi, sambit patras
priyanka gandhi, sambit patrassarkarnama

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी लागले आहेत. कॉग्रेसने आपली रणनिती आखायला सुरवात केली आहे. कॉग्रेस महासचिव आणि उत्तरप्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी (priyanka gadhi) या अमेठी (Amethi) किंवा रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांच्या अचानक राजकारणात सक्रीय होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (sambit patras) यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एक कार्यक्रमात बोलत असताना संबित पात्रा यांनी प्रियंका गांधींवर खोचक टीका केली.

संबित पात्रा म्हणाले की, आम्ही इटालियन आहोत. त्यामुळेच आम्ही रामायण कसे वाचणार? हे लोक भारतीय आहेत.आज ते श्लोक वाचत आहेत. पण हे तेच लोक आहेत ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते की राम मंदिराच्या विषयावर सुनावणी आता करू नका. कारण निवडणुका आल्या आहेत. याच लोकांनी भगवान श्रीराम यांचे अस्तित्वही नाकारले होते. जेव निवडणुका येतात तेव्हा त्यांना हिंदूत्वाची आठवण येते. ते गळ्यात भगवी उपरणे टाकून फिरू लागतात.

'' २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन दिवस मला समजलेच नाही की प्रियंका गांधी आहेत की राधे मॉँ,''अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. ''त्यांनी रामायण वाचले नाही. रावणाने कालनेमी नावाच्या राक्षसाला सांगितले होते की रामनामाचा जप करत हनुमानाला संजीवनी आणण्यासाठी रोख. भाजपने रामायण वाचले असते तर त्यांना काहीतरी शिकवण नक्कीच मिळाली असती,'' अशी टीका कॉँग्रेसचे प्रवक्ते अभय दुबे यांनी भाजपवर केली आहे.

priyanka gandhi, sambit patras
आमदार अशोक पवार संतापले ; रुबी हॉलच्या चौकशीचे आदेश

विधानसभेबरोबरच २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसंदर्भातही कॉग्रेसची तयारी सुरु असल्याचे समजते. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बहिण प्रियंका गांधी यांनी जोरदार तयारी केली आहे. प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेशातून अमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढविणायाचा सल्ला निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी प्रियंका यांना दिला असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रियंका गांधी यांचा अमेठी आणि आगामी निवडणुकीबाबतचा दैारा आणि बैठकांमधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहे.

प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशमधील कॉग्रेसचा चेहरा असल्याचे म्हटलं आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषीत केलं जाऊ शकते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठक्कर देण्यासाठी प्रियंकांना पुढे केलं जाऊ शकतं. प्रियंका या नेहमीच योगी आदित्यनाथ यांच्यावर टि्वटच्या माध्यमातून हल्लाबोल करीत असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com