भाजपनं मोफत सरकारी रेशन कीटलाही नाही सोडलं! राज्यांना दिले 'हे' आदेश...

भाजपचे महासचिव अरूण सिंह यांनी सर्व भाजपशासित राज्यांना याबाबतचे पत्र लिहिले आहे.
BJP planning PM Narendra Modi and Lotus picture on ration kit
BJP planning PM Narendra Modi and Lotus picture on ration kit

नवी दिल्ली : कोरोना लशीच्या (Corona Vaccine) प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून बराच वाद झाला. आता गरीबांना दिल्या जाणाऱ्या मोफत सरकारी रेशन कीटवर मोदींसह कमळाचे चिन्ह छापले जाणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्य योजनेअंतर्गत (Prime Minister Garib Kalyan Anna Yojana) या कीटचे मोफत वाटप केले जाणार आहे. या कीटवर कमळाचे चिन्ह छापण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. या आदेशावरूनही आता वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. (BJP planning PM Narendra Modi and Lotus picture on ration kit)

देशात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लस घेतलेल्या नागरिकांना केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र दिले जात आहे. या प्रमाणपत्रवर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र असते. त्यावर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर मोदींचे छायाचित्र हटवत त्याजागी स्वत:चे छायाचित्र लावले. आता पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रासह भाजपचे चिन्ह असलेले कमळ रेशन कीटवर दिसणार आहे. 

भाजपचे महासचिव अरूण सिंह यांनी सर्व भाजपशासित राज्यांना याबाबतचे पत्र लिहिले आहे. भाजपशासित राज्यांतील सर्व रेशनिंग दुकानांवर पाच किलो गहू किंवा तांदूळ वितरणाचे बॅनर लावावेत. त्यावर पंतप्रधान मोदी व राज्याच्या मुख्यमंत्र्याचे छायाचित्र असायला हवे. या बॅनरचे डिझाईनही भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून निश्चित करण्यात आले आहे. हे डिझाईन प्रदेशाध्यक्षांना पाठवण्यात आले आहे. रेशन कीटचे डिझाईनही निश्चित केले असून त्यावर कमळाचे चिन्ह लावून वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

रेशन कीटवर कमळाचे चिन्ह असायला हवे, याबाबत लोकप्रतिनिधींसह सर्व पदाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये कमळाचे चिन्ह छापलेली कीट वितरित करण्यास सांगण्यात आले आहे. या राज्यांमध्ये बॅनरवर मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राऐवजी स्थानिक लोकप्रतिनिधींचे छायाचित्र असेल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही याचा प्रचार केला जाणार आहे. लोकप्रतिनिधींना रेशन दुकानावर जाऊन लाभार्थ्यांची भेट घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रत्येक दुकानावर प्रिंटेड बॅग देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कार्यकर्त्यांनी यावर लक्ष ठेवावे, अशा सुचना देण्यात आलल्या आहेत. 

केंद्र सरकारची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याने भाजपनेही नोव्हेंबर महिन्यापर्यंत असाच प्रचार सुरू ठेवण्याचे निश्चित केले आहेत. या योजनेअंतर्गत देशात 80 कोटी नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत दर महिन्यालला पाच किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com