आधी हरलेल्या 'निरहुआ'वर भाजपचा पुन्हा विश्वास! नक्वींना थेट उपराष्ट्रपतिपद?

लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकांसाठी भाजपची यादी जाहीर
Nirhua and Narendra Modi
Nirhua and Narendra Modi Sarkarnama

नवी दिल्ली : भाजपने (BJP) लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. यात उत्तर प्रदेशातील आजमगड आणि रामपूर लोकसभा पोटनिवडणुकांतील (Lok Sabha Election) उमेदवारांचा समावेश आहे. आजमगडमधून अखिलेश यादव यांच्याविरुद्ध यापूर्वी पराभूत झालेले बिहारी गायक आणि अभिनेते दिनेशलाल यादव 'निरहुआ' यांना भाजप नेतृत्वाने पुन्हा संधी दिली आहे. पण केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा या यादीत समावेश नाही. त्यामुळे त्यांना उपराष्ट्रपती बनवले जाण्याची शक्यता बळावल्या आहेत. (Lok Sabha Byelection News)

नक्वी, सय्यद जाफर इस्लाम आणि एम.जे अकबर हे राज्यसभेतून निवृत्त होत असल्याने आता भाजपचा संसदेत एकही मुस्लिम खासदार नाही. दरम्यान, त्रिपुरातील टाऊन बोरदोवली विधानसभा मतदारसंघात भाजपने मुख्यमंत्री डॉ. माणिक शाह यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने 5 राज्यातील 9 विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकांसाठी आज उमेदवारांची घोषणा केली. (Assembly Byelection News)

भाजपने जाहीर केलेल्या यादीत उत्तर प्रदेशच्या आजमगड लोकसभा मतदारसंघात दिनेशलाल यादव 'निरहुआ' यांच्यावर पुन्हा संधी मिळाली आहे. हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांतील लोकप्रिय कलाकारांना संसदेवर आणण्याची परंपरा प्रमोद महाजन व लालकृष्ण आडवाणी यांच्या काळात भाजपमध्ये सुरू झाली. शत्रुघ्न सिन्हा हे या यादीतील पहिले नाव. सध्या रवीकिशन, मनोज तिवारी यासारखे भोजपुरी अभिनेते- गायक भाजपचे खासदार आहेत. मात्र, निरहुआ यांचा नव्या पिढीवरील प्रभाव त्यांच्यापेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते.

Nirhua and Narendra Modi
राजकारण तापलं! भाजपच्या आयारामाला पुढं करून काँग्रेस टाकणार मुख्यमंत्र्यांवर डाव

निरहुआ यांना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी यापूर्वी याच आजमगड मतदारसंघात पराभूत केले होते. अखिलेश यादव आता उत्तर प्रदेशच्या विधानसभेवर गेल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. तेथून भाजपने पुन्हा एकदा निरहुआ यांना तिकीट दिले आहे. या जागेवर अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल या समाजवादी पक्षाच्या उमेदवार असतील, अशी शक्यता आहे. यामुळं आता पुन्हा निरहुआ यांचा सामना अखिलेश यादव यांच्याशीच होणार आहे.

उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने घनश्याम लोधी यांना रिंगणात उतरवले आहे. रामपूर हा मुख्तार अब्बास नक्वी यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे राज्यसभेवर त्यांना तिकीट न दिल्यानंतर रामपूरमधून लोकसभेसाठी संधी मिळेल, अशी चर्चा भाजप वर्तुळात होती. प्रत्यक्षात भाजपने रामपूरमधूनही हिंदू उमेदवारच दिल्याने आता संसदेत भाजप बाकांवर एकही मुस्लिम खासदार दिसणार नाही.

Nirhua and Narendra Modi
पत्नीनं रंगेहाथ पकडताच काँग्रेसच्या बड्या नेत्याची राजकारणातून विश्रांती

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील चेहऱ्याबाबत भाजप नेतृत्वाने गुप्तता ठेवली आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि त्या जागेवर मुस्लिम चेहरा आणला जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमासुधाराची भाजप नेतृत्वाची योजना असू शकते. अमेरिकी संसदेला सादर झालेल्या व मुस्लिम अत्याचारांबाबत आरसा दाखवणार्‍या अहवालावर भारताने आक्षेप घेतला होता. मात्र, चारपैकी एका सर्वोच्च घटनात्मक पदावर अल्पसंख्याक व्यक्ती असणे हे भारतातच घडू शकते, हा संदेश यानिमित्ताने देण्याचा हेतू असू शकतो. त्यामुळे नक्वी आणि केरळचे राज्यपाल अरीफ महंमद खान यांची नावे संभाव्य उपराष्ट्रपतिपदासाठी चर्चेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com