Vinod Tawde : मुर्मूंचा ऐतिहासिक विजय अन् विनोद तावडेंच्या शिरपेचात आणखी एक तुरा

भाजपच्या राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापन समितीत तावडे सहसंयोजक होते.
Droupadi Murmu Latest News, Vinod Tawde Latest Marathi News
Droupadi Murmu Latest News, Vinod Tawde Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : मागील काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात फारसे सक्रीय नसलेले भाजपचे (BJP) नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रीय पातळीवर मात्र आपल्या संघटन कौशल्याचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे पक्षांकडून त्यांच्यावर सातत्याने मोठी जबाबदारी टाकली जात आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या (President) निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्वाची ठरली. त्यामुळे एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना मोठ्या मताधिक्याने मिळालेल्या विजयानंतर तावडे यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. (Vinod Tawde Latest News)

राज्यात 2014 मध्ये फडणवीस सरकारची सत्ता आल्यानंतर तावडे यांच्यावर शिक्षण खात्याची जबाबदारी आली. पण 2019 च्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यानंतर ते राज्याच्या राजकारणापासून काहीसे दूर गेले. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली. सध्या ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

Droupadi Murmu Latest News, Vinod Tawde Latest Marathi News
आदित्य ठाकरेंना सुहास कांदे विचारणार `माझे काय चुकले?`

हरयाणाचे प्रभारी म्हणूनही त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. चंदीगड महापालिका निवडणुकीचे प्रभारी असताना भाजपने आपकडून सत्ता काबीज केली. चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत राजकीय डावपेच यशस्वी ठरल्याने भाजपचा महापौर बनला.

मे महिन्यात त्रिुपराचे तत्कालीन मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या राजीनाम्यानंतर विनोद तावडे आणि राज्यसभेचे खासदार भूपेंद्र यादव यांना पक्षीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. तिथेही नवीन मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीवेळी पक्षात नाराजी निर्माण झाली नाही. याठिकाणीही तावडे यांचे संघटनकौशल्य कामी आले. त्यामुळेच तावडे यांना लाडू भरवून मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला.

Droupadi Murmu Latest News, Vinod Tawde Latest Marathi News
नेहरू-गांधींच्या नावावर आम्ही तीन पिढ्या बसून खातील एवढं कमावलं! काँग्रेस आमदाराची कबुली

त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची सर्वात मोठी जबाबदारी टाकण्यात आली. भाजपच्या 'राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापन समिती'त विनोद तावडे यांना सहसंयोजक म्हणून नेमण्यात आलं होतं. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासह तावडे व सी. टी. रवी या दोन राष्ट्रीय सरचिटणीसांचा समितीत समावेश होता.

अन्य पक्षांचे आमदार, खासदार यांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधून मुर्मू यांना मतदानासाठी वळविण्याची जबाबदारी राजनाथ सिंह यांच्यासह तावडेंवर होती. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील नेत्याकडे अशी मोठी जबाबदारी पक्षाकडून प्रथमच देण्यात आली होती. त्यामुळे मुर्मू यांना मिळालेल्या मताधिक्यामध्ये तावडे यांची भूमिकाही महत्वाची ठरली आहे.

पक्षाच्या कार्यालयीन कामकाजातही तावडे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे नमो अॅप, मायक्रो डोनेशन मोहिमेची जबाबदारीही तावडे यांच्यावर आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय पातळीवर तावडे यांच्या कामाचा आलेख चढताच राहिल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in