...तो व्हिडीओ पाहून वरूण गांधीही हळहळले अन् आपल्याच सरकारवर बरसले!

वरूण यांनी यापूर्वीही अऩेकदा भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे.
Varun Gandhi
Varun GandhiSarkarnama

लखनऊ : उत्तर प्रदेशातील भाजपचे (BJP) खासदार वरूण गांधी (Varun Gandhi) मागील काही दिवसांपासून सतत मोदी व योगी सरकारवर टीका करत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा योगी सरकारला घरचा आहेर दिला आहे. हातात लहान मुलं असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांकडून काठीने मारले जात असल्याचा व्हिडीओ ट्विट करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरच त्यांनी बोट ठेवलं आहे.

कानपूरमधील एक व्हि़डीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही लोक या परिसरात रुग्णालयात गोंधळ घालत होते. रुग्णालयातील ओपीडी बंद करण्याचा प्रयत्न सुरू होता. इतर रुग्णांना घाबरवत होते. त्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी बळाचा वापर केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Varun Gandhi
काहींच्या अहंकारासाठी निर्णय घेऊ नका! उच्च न्यायालयानं भाजपला फटकारलं

व्हिडीओमध्ये हातात लहान मुलं घेतलेल्या एका व्यक्तीला पोलीस काठ्यांनी मारत असल्याचे दिसत आहे. लहान मुलं रडत असतानाही पोलीस या व्यक्तीच्या मागे पळत असल्याचे दिसते. तसेच त्याला पकडून गाडी बसवण्याचा प्रयत्न करताना मुलालाही ओढून घेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर या व्यक्तीला सोडून देण्यात आले. हाच व्हिडीओ वरूण गांधी यांनी ट्विट केला आहे.

व्हि़डीओ ट्विट करून त्यांनी म्हटलं आहे की, गरीबातील गरीब व्यक्तीला न्याय मिळेल, अशी सशक्त कायदा-सुव्यवस्था असते. न्याय मागणाऱ्यांनाच अन्यायायाचा सामना करावा लागत असेल तर ते वेदनादायी आहे. भयभीत समाज कायद्याच्या राज्याचे उदाहरण नव्हे. जिथे कायद्याचे भय असते, पोलिसांचे नसते, ती खरी सशक्त कायदा-सुव्यवस्था असते, असा टोला गांधी यांनी योगी सरकारला लगावला आहे.

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (UP Assembly Election) होणार आहे. यापार्श्वभूमीवर वरूण गांधी यांच्याकडून सतत भाजपवर टीका केली जात असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. शेतकरी आंदोलनावरूनही त्यांनी अनेकदा सरकारला सुनावलं आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाच्या प्रकरणावरूनही त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com