हुकूमशहा हे बलाढ्यांसमोर झुकतात! भाजप खासदाराचाच मोदींवर निशाणा
PM Narendra Modi

हुकूमशहा हे बलाढ्यांसमोर झुकतात! भाजप खासदाराचाच मोदींवर निशाणा

भारत आणि चीन यांच्यात सीमावादावर झालेली लष्करी पातळीवरील चर्चेची तेरावी फेरी निष्फळ ठरली आहे.

नवी दिल्ली : भारत (India) आणि चीन (China) यांच्यात सीमावादावर झालेली लष्करी पातळीवरील चर्चेची तेरावी फेरी निष्फळ ठरली आहे. भारतीय लष्कराने दिलेला प्रस्ताव चिनी सैन्याने नाकारल्यामुळे सैन्याच्या माघारीबाबत ठोस तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) तुलना हुकूमशहाशी केली आहे.

लडाख सीमेवरील हॉटस्प्रिंग भागातील सैन्यमाघारीबाबत 10 ऑक्टोबरला लष्करी पातळीवरील चर्चा चिनी हद्दीतील चुशूल मोल्डो भागात झाली. लष्कराच्या 14 कोअर कमांडरचे लेफ्टनंट जनरल पी. जी. के. मेनन आणि चीनचे मेजर जनरल लियु लीन यांच्यात ही चर्चा झाली. तब्बल साडेआठ तास चर्चा होऊनही यातून काहीच निष्पन्न झाले नाही. यानंतर भारतीय लष्करानेच चीनच्या आडमुठेपणाची माहिती दिली आहे.

यावरून भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा केंद्र सरकारने इन्कार केला आहे. चीनने घुसखोरी केलीच नाही तर मग आपण चर्चा कशासाठी करीत आहोत. त्यांनी मोदींची तुलना हुकूमशहाशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, समोरासमोर 18 वेळा बैठका आणि पाच वेळी मोदींनी चीनला भेट देऊनही हाती काहीच लागले नाही. तरीही आपण चीनसमोर याचकेच्या भूमिकेत उभे आहोत. हुकूमशहा हे बलाढ्यासमोर झुकतात तर दुबळ्यांसमोर उद्दामपणे वागतात.

PM Narendra Modi
एअर इंडियाची टाटाला विक्री ही तर 'पाँझी स्कीम'! भाजप खासदाराचा घरचा आहेर
PM Narendra Modi
मोठी बातमी : मुंबई पोलिसांसमोर सीबीआय संचालक चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

नुकत्याच झालेल्या बैठकीत अन्य क्षेत्रांशी संबंधित मुद्द्यांवर तोडगा निघू शकला नाही. या बैठकीत भारतीय लष्कराने इतर क्षेत्रांमधील तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक उपाय सुचविले होते. मात्र चिनी सैन्याने सहमती दर्शवली नाही. चर्चेतील प्रगतीसाठी चीनकडून कोणताही प्रस्ताव देण्यात आला नाही. त्यामुळे बैठकीत अन्य क्षेत्रांबाबत काहीही तोडगा निघू शकला नाही, असे निवेदन भारतीय लष्कराने केले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in