भाजप खासदारानेच मोदी सरकारविरोधात आघाडी उघडून केली कोंडी!

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आता केंद्रातील सत्ताधारी भाजपचेनेतेचसरकारला लक्ष्य करु लागले आहेत.
bjp mp subramanian swamy targets bjp government over petrol and diesel rise
bjp mp subramanian swamy targets bjp government over petrol and diesel rise

नवी दिल्ली : देशात पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. विरोधकांकडून इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारला घेरले जात आहे. या मुद्द्यावर भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. ही इंधनदरवाढ जनतेची शोषण करणारी आहे, असा घरचा आहेर त्यांनी सरकारला दिला आहे.  

केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोलवर अडीच रुपयांचा आणि डिझेलवर चार रुपयांचा कृषी उपकर लावला. यामुळे इंधनाचे दर कमी होतील, ही मध्यमवर्गीयांची अपेक्षा फोल ठरली. उत्पादन शुल्काच्या रकमेतून सरकार वर्षाला सुमारे दीड ते दोन लाख कोटी रुपये वसूल करत आहे. इंधनाचे दर हे अर्थसंकल्पानंतर कमी होणार असल्याची अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर विरोधकांबरोबरच भाजपचे सुब्रमण्यम स्वामीही सरकारवर टीका करायला सरसावले आहेत. 

स्वामींनी आपल्यास सरकारची आता कोंडी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जनतेचा आवाज अगदी कमी वेळा स्पष्ट आणि मोठा असतो. आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर जनतेचा एकमुखी आवाज ऐकू येऊ लागला आहे. इंधनदरवाढ ही शोषण करणारीच आहे. सरकारने आता जिंकण्याची बाजू सोडून कर कमी करायला हवेत. 

याआधी इंधन दरवाढीवरुन स्वामींना सरकारला घेरले होते. नेपाळ ही सीतेची जन्मभूमी मानली जाते, तर लंका ही रावणाची मानले जाते. या दोन्ही देशांमध्ये पेट्रोलचे दर भारतापेक्षा निम्म्याने कमी असल्याचे स्वामी यांनी दाखवून दिले होते. सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोल ५३ रुपये प्रतिलिटर, रावणाच्या लंकेत ५१ रुपये प्रतिलिटर तर रामाच्या भारतात ते ९३ रुपये  आहे, असा चिमटा स्वामी यांनी काढला होता. 

त्यानंतर समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंभर प्रसाद निषाद यांनी हाच मुद्दा उपस्थित करून रामाच्या देशात सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते, या देशांसोबत भारताची तुलना करणे चुकीचे आहे. कारण तिथे पेट्रोल-डिझेलचा वापर करणारे कमी आहेत. रॉकेलच्या दरात भारत व इतर देशांमध्ये खूप अंतर आहे. बांग्लादेश व नेपाळमध्ये रॉकेलचे दर प्रति लिटर 57 ते 59 रुपये एवढे आहे. तर भारतात रॉकेल केवळ 32 रुपये प्रति लिटर मिळते. 

काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनीही देशात पेट्रोल व डिझेलच्या किमती सर्वाधिक असल्याचा मुद्दा राज्यसभेत नुकताच उपस्थित केला होता. तसेच, खनिज तेलाच्या किमती मात्र आतापर्यंतच्या सर्वाधिक नसल्याचे ते म्हणाले होते.  त्यावर बोलताना प्रधान म्हणाले होते की, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती 61 डॉलरवर पोहचल्या आहेत. त्यामुळे सध्या आपल्या इंधनावरील कराबाबत खूप सावधपणे निर्णय घ्यावे लागतील. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com