भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानंच मोदी सरकारला झोडपलं! थेट दाखवलं रिपोर्ट कार्ड...

मोदी हे भारताचे राजे नाहीत, अशी टीका स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
Subramanian Swamy and Narendra Modi
Subramanian Swamy and Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. मोदी हे भारताचे राजे नाहीत, अशी टीका त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला झोडपून काढलं आहे. गुरूवारी सकाळी एक ट्विट करत मोदी सरकारच्या कामाचं रिपोर्ट कार्डचं सादर केलं आहे.

स्वामी यांनी मोदी सरकार अनेक क्षेत्रांत अपयशी ठरल्याची टीका केली आहे. अर्थव्यवस्था, सीमा सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र धोरणांबाबत बोलताना त्यांनी अफगाणिस्तान समस्येबाबत फज्जा उडाल्याची टीका कली आहे. पेगॅससचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काश्मीरमधील अस्थिरतेचा उल्लेख करत त्यांनी अंतर्गत सुरक्षेतही मोदी सरकारला अपयश आल्याचा दावा केला आहे.

Subramanian Swamy and Narendra Modi
राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देणार

स्वामी यांनी पाच मुद्दे उपस्थित करून त्यांनी या सर्व गोष्टींना जबाबदार कोण आहे, असा सवाल केला आहे. याचे उत्तर त्यांनी सुब्रह्मण्यम स्वामी असं दिलं देत पंतप्रधान मोदींना टोला लगावल्याची चर्चा आहे. स्वामी यांच्या या ट्विटला जवळपास दहा हजार लाईक्स आहेत. दोन हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे.

दरम्यान, स्वामी यांनी यापूर्वी अनेकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून स्वामींना वगळण्यात आलं आहे. याबाबत एका व्यक्तीने स्वामी यांनी ट्विटरवर छेडले होते. तुम्हाला मंत्रिपद न मिळाल्याने तुम्ही भाजप सरकारवर टीका करीत आहात, असा आरोप त्या व्यक्तीने केला होता. यावर स्वामी यांनी उत्तर देताना थेट मोदींवर निशाणा साधला होते. त्यांनी म्हटले होते की, मी मोदीविरोधी आहे. माझा मोदींच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांना विरोध आहे. यासंबंधी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींशी समोरासमोर चर्चा करण्यासही मी तयारी आहे. तुम्ही सहभागाच्या तत्वावर चालणारी लोकशाही ऐकली आहे का? मोदी हे काय भारताचे राजे नाहीत.

काही दिवसांपूर्वी स्वामी यांनी भाजपच्या आयटी सेलला लक्ष्य केले होते. भाजपच्या आयटी सेलवरून सोशल मीडियावर अक्षरशः घाण पसरवली जात आहे. अमित मालवीय यांच्या अध्यक्षतेखालील हा सारा विभाग बदमाश तसेच धूर्त बनल्याची टीका स्वामी यांनी केली होती. स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मालवीय यांना त्वरित पदावरून हटवा, अशी मागणी केली होती. स्वामी यांनी भाजपच्या आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनाच निशाण्यावर घेतले आहे. मात्र, अमीत मालवीय यांनी स्वामी यांना थेट प्रत्युत्तर दिलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com