रुग्णवाहिकांमधून कोरोनाबाधितांचे मृतदेह आणून गंगेत टाकताहेत; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीपात्रात आतापर्यंत शेकडो मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह कोरोनाबाधितांचे असल्याचा दावा भाजप खासदाराने केला आहे.
bjp mp says covid patients dead bodies thrown in ganga river
bjp mp says covid patients dead bodies thrown in ganga river

लखनौ : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमध्ये (Bihar) गंगा (Ganga) नदीपात्रात आतापर्यंत शेकडो मृतदेह (Dead Bodies) आढळून आले आहेत. हे मृतदेह कोरोनाबाधितांचे (Covid19) असल्याची चर्चा असून, यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता भाजपच्या (BJP)  खासदाराने या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. रुग्णवाहिकांमधून आणून कोरोनाबाधितांचे मृतदेह गंगेत टाकले जात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. 

याबाबत  भाजपचे खासदार जनार्दनसिंह सिगरीवाल म्हणाले की, कोरोनाबाधितांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून आणून गंगेत टाकले जात आहेत. उत्तर प्रदेशमधील बलियाच्या सीमेनजीक बिहारमधील सारण जिल्ह्यात जयप्रभा सेतू आहे. तेथे गंगा नदीत हे मृतदेह टाकण्यात येत आहेत. या प्रकरणी सारण जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. रुग्णवाहिका चालकांनी कोरोनाबाधितांचे मृतदेह नदीत फेकू नयेत यासाठी कारवाई करायला हवी. 

मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. काही राज्यांमध्ये भयावह स्थिती आहे. त्यापैकी बिहार व उत्तर प्रदेशातील आरोग्य व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. रुग्णांच्या चाचण्यांपासून ते रुग्णांना बेड मिळणेपर्यंत अनेक अडथळे येत आहेत. आता रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यातही अडथळे येत असल्याची स्थिती आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. त्यातच आता गंगा नदीत शेकडो मृतदेह वाहून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

अद्याप कोरोनाचा चाचणीचा अहवाल हाती नाही 
मृतदेह कोरोनाबाधितांचे आहे की नाहीत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. स्थानिक प्रशासनाकडून याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नसला तरी स्थानिक नागरिकांनी हे मृतदेह कोरोनाबाधित रुग्णांचे असावेत, असे म्हटले आहे. प्रशासनाने या मृतदेहांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. याचे अहवाल हाती आल्यानंतर स्पष्टपणे बोलता येईल, अशी प्रशासनाने भूमिका घेतली आहे. 

सुरवातीला बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदी पात्रात 71 मृतदेह वाहून आले होते. नंतर उत्तर प्रदेशातील गाझीपूर आणि बलिया येथे गंगा नदी पात्रात 45 मृतदेह सापडले होते. बिहार व उत्तर प्रदेश सीमेवर गंगा नदीमध्ये मागील काही दिवसांपासून मृतदेह वाहून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

जलशक्ती मंत्रालयाने घेतली दखल 
आता या संपूर्ण प्रकाराची दखल जलशक्ती मंत्रालयाने घेतली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले की, गंगा नदीत मृतदेह टाकणे हे दुर्देवी आहे. मोदी सरकार गंगेचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दोन्ही राज्यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com