खासदार राजीव प्रताप रुडी म्हणतात, मला रुग्णवाहिका चालवायलाही माणूस मिळेना..! - bjp mp rajiv pratap rudy says he does not get driver for ambulances | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

खासदार राजीव प्रताप रुडी म्हणतात, मला रुग्णवाहिका चालवायलाही माणूस मिळेना..!

वृत्तसंस्था
शनिवार, 8 मे 2021

कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे आता विक्रमी पातळीवर पोचले आहेत. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे आता विक्रमी पातळीवर पोचले आहेत. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका  (Ambulance) मिळत नसल्याचे चित्र असताना भाजप (BJP) खासदार राजीव प्रताप रुडी (Rajiv Pratap Rudy) यांच्या तीसहून अधिक नव्या रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावर अखेर रुडी यांनी खुलासा करीत हतबलता व्यक्त केली आहे. (bjp mp rajiv pratap rudy says he does not get driver for ambulances)  

बिहारमधील सारण येथील भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या या रुग्णवाहिका आहेत. त्यांनी खासदार निधीतून खरेदी केलेल्या या रुग्णवाहिका आहेत. रुडी यांच्या मालकीच्या जागेवर या रुग्णवाहिका झाकून ठेवण्यात आलेल्या होत्या. बिहारमध्ये अनेक रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्याचे चित्र आहे. याचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. 

हेही वाचा : कंगना म्हणाली, कोरोना हा एक छोटा फ्लू असून, तो माझ्या शरीरात पार्टी करतोय! 

जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष पप्पू यादव यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. याविषयी बोलताना पप्पू यादव म्हणाले की, राज्यात सर्वाधिक गरज असताना या रुग्णवाहिका का धूळ खात पडल्या आहेत? येथे तब्बल 30 रुग्णवाहिका आहे. येथे एकूण 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका होत्या. त्यातील काही नंतर दुसरीकडे हलवण्यात आल्या. त्यांचा वापर का होत नाही याचे उत्तर खासदार रुडी यांनी द्यावे? बिहारच्या जनतेसाठी या रुग्णवाहिका असताना त्या जनतेला नेमक्या वेळी मिळत नाहीत. 

यावर अखेर खासदार रुडी यांनी खुलासा केला आहे. ड्रायव्ह नसल्याने या रुग्णवाहिका उभ्या असल्याचे रुडी यांनी म्हटले आहे. याबाबत छपराच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून रुग्णवाहिका चालवण्यासाठी ड्रायव्हर मिळावेत, अशी विनंती केल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांनी म्हटले आहे की, पप्पू यादव यांनी दावा केल्याप्रमाणे 60, 70 अथवा 100 रुग्णवाहिका नसून, केवळ 20 रुग्णवाहिका आहेत. ड्रायव्हर नसल्यामुळे त्या उभ्या आहेत. पप्पू यादव यांनी सर्व रुग्णवाहिका घेऊन जाव्यात पण सारणमधील जनतेच्या सेवेसाठी ड्रायव्हरसह या रुग्णवाहिका तैनात कराव्यात.  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख