थेट संसदेतच भाजप खासदाराच्या हातात दारूच्या बाटलीचा बॉक्स अन् ग्लास (Video)

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.
Parvesh Sahib Singh
Parvesh Sahib SinghSarkarnama

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Parliament Winter Session) सोमवारी भाजपच्या (BJP) खासदारांनी थेट दारूच्या बाटलीचा रिकामा बॉक्स आणला. त्यांनी लोकसभेत (Lok Sabha) दिल्लीतील केजरीवाल सरकार टीका करताना एका हातात ग्लास आणि एका हातात बॉक्स धरला होता. केजरीवाल सरकारकडून दिल्लीत दारूला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप या खासदारांनी केला. तसेच त्यांनी दिल्लीतही दारूबंदीची मागणी केली.

भाजपचे दिल्लीतील खासदार परवेश साहिब सिंह वर्मा (Parvesh Sahib Singh) यांनी सोमवारी संसदेत दिल्ली सरकार जोरदार टीका केली. भाषणापूर्वीच ते संसदेत दारूच्या बाटलीचा रिकामा बॉक्स घेऊन आले होते. भाषण सुरू असताना सुरूवातीला त्यांनी पाण्याने अर्धा भरलेला काचेचा ग्लास एका हातात धरून वर केला. त्यानंतर दुसऱ्या हाताने रिकामा बॉक्स सभागृहाला दाखवला. त्यानंतर सभापतींनी त्यांना बोलण्यापासून रोखले.

Parvesh Sahib Singh
परमबीरसिंह प्रकरणात ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

यावेळी बोलताना वर्मा म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी संपूर्ण दिल्लीला दारू पाडण्याचा विडा उचलला आहे. दिल्ली सरकार महसूल वाढवण्यासाठी दिल्लीचे भविष्य संकटात टाकत आहे. त्यामुळे बिहार आणि गुजरातप्रमाणे दिल्लीतही पूर्ण किंवा अंशत: दारूबंदी करण्याची गरज आहे. दिल्लीत आजपासून 824 दारूची नवी दुकाने सुरू केली जात आहेत. दारू खरेदी करण्याचे वय 25 वरून 21 करण्यात आले आहे. महिलांसाठी पिंक बार सुरू केले जाणार आहेत, असे वर्मा यांनी सांगितले.

केजरीवाल सरकार दारूच्या ठेक्यांमधून 10 हजार कोटी रुपयांची अबकारी कर गोळा करू इच्छिते. एकीकडे केजरीवाल पंजाबला नशामुक्त करण्याचे आश्वासन देतात. तर दुसरीकडे दिल्लीत नशेला प्रोत्साहन देत आहेत. यामुळे दिल्लीत घरगुती हिंसाचारात वाढ होईल. मागील वर्षी 2047 घटना घडल्या आहे. आता या घटनांमध्ये वाढ होणार नाही का, असा सवालही वर्मा यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com