खासदार लग्नात नाचण्यासाठी तंदुरुस्त पण घरी कोरोना लस घेण्यासाठी आजारी!

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या कायम वाद ओढवून घेत असतात. आता त्यांच्या लसीकरणावरुन वाद सुरू झाला आहे.
bjp mp pragya thakur receive fist covid jab at her home
bjp mp pragya thakur receive fist covid jab at her home

भोपाळ : भाजपच्या (BJP) खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Thakur) या कायम वाद ओढवून घेत असतात. त्या मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Blasts) खटल्यात आरोपी आहेत. या खटल्याच्या सुनावणीस प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहण्यापासून सवलत घेणाऱ्या ठाकूर लग्नात नाचताना दिसल्या होत्या. परंतु, आजारी असल्याचे सांगून त्यांना घरीच कोरोना लस (Covid Vaccination) देण्यात आली आहे. यावरुन गदारोळ उडाला आहे. 

आता खासदार ठाकूर यांनी घरीच कोरोना लस घेतली आहे. यावरुन प्रश्न उपस्थित होऊ लागले. यावर आजारी आणि दिव्यांग व्यक्तींना घरी जाऊन लस देण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. ठाकूर यांनी पहिलाच डोस घेतला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी एका विवाह समारंभात नाचताना दिसल्या होत्या. यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. लग्नात नाचण्यासाठी तंदुरुस्त असलेल्या खासदार आता लस घेण्यासाठी आजारी कशा पडल्या, असा सवाल विरोधक करीत आहेत. यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. 

साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या स्फोटांमध्ये 10 जण ठार तर 82 जण जखमी झाले होते. या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यांना या प्रकरणात अटक झाली होती. नंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना 2017 जामीन मंजूर झाला होता. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदारसंघातून उभे राहात  काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचा पराभव केला होता. त्यांनी मोठ्या मताधिक्याने हा विजय मिळवला होता. 

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीस न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत मिळावी, अशी मागणी अनेक वेळा ठाकूर यांनी केली आहे. असे असताना आता त्या लग्नात नाचत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. हा विवाह समारंभ त्यांच्याच निवासस्थानी झाला होता. गरीब कुटुंबातील दोन जुळ्या मुलींचा हा विवाह समारंभ होता. या वेळी 51 वर्षांच्या ठाकूर या नाचताना दिसल्या होत्या. 

काँग्रसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी ठाकूर या नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या कायम व्हिलचेअरवर न्यायालयात जाताना दिसतात. त्यामुळे सलूजा यांनी ठाकूर यांची फिरकी घेतली आहे. त्यांनी म्हटले होते की, आमच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना बास्केटबॉस खेळताना, कुणाचा आधार न घेता चालताना आणि असे आनंदाने नाचताना पाहून खूप बरे वाटते ना.

काही दिवसांपूर्वी प्रज्ञा ठाकूर या बास्केटबॉल खेळताना दिसल्या होत्या. याचा व्हिडीओही सलूजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी म्हटले होते की, भोपाळच्या भाजप खासदार साध्वी ठाकूर यांना आतापर्यंत व्हीलचेअरवर पाहिले होते. परंतु, त्यांना आज भोपाळध्ये बास्केटबॉल कोर्ट खेळताना पाहिले आणि खूप आनंद झाला. आतापर्यंत आम्हाला वाटत होते की त्यांना काही तरी आजार असून, त्यांना उभे राहता येत नाही. ईश्वराने त्यांना सदैव निरोगी ठेवावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com