खासदारानं व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना रावण असं म्हणून दिला शाप!

भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर या कायम नवीन वाद ओढवून घेत असतात. आता त्यांनी एकाला शाप दिला आहे.
Pragya Singh Thakur
Pragya Singh Thakur

भोपाळ : भाजपच्या (BJP) खासदार प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Thakur) या कायम वाद ओढवून घेत असतात. त्या मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Blasts) खटल्यात आरोपी आहेत. या खटल्याच्या सुनावणीस प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित न राहणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, आता हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना ठाकूर यांनी शाप दिला आहे.

व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला ठाकूर यांनी रावण असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, माझा व्हिडीओ काढून तो सगळ्यांना पाठवणारा रावण आहे. त्याला वार्धक्यात आणि पुढील जन्मात खूप त्रास सहन करावा लागेल. व्हिडीओ काढणारा हा माझा खूप मोठा शत्रू नसेल पण तो मला शत्रू मानत आहे. त्याच्याकडून मी कोणती मौल्यवान वस्तू काढून घेईन हे त्यालाही कळणार नाही. देशभक्त, क्रांतिकारी आणि संतांना त्रास देणारे कधीही वाचणार नाहीत.

भोपाळमधील काली मंदिरात प्रज्ञा या गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुलींसोबत कबड्डी खेळली होती. कबड्डी खेळण्याची विनंती त्यांनी खेळाडूंनी केली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला आहे. काँग्रेसने यावरून प्रज्ञा यांच्यावर निशाणा साधला आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास यांनी यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. मालेगाव प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयात पुढील सुनावणी कधी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

खासदार ठाकूर यांनी 14 जुलैला घरीच कोरोना लस घेतली होती. यावरुन प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावर आजारी आणि दिव्यांग व्यक्तींना घरी जाऊन लस देण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी एका विवाह समारंभात नाचताना दिसल्या होत्या. यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. लग्नात नाचण्यासाठी तंदुरुस्त असलेल्या खासदार आता लस घेण्यासाठी आजारी कशा पडल्या, असा सवाल विरोधकांनी केला होता.

Pragya Singh Thakur
डॉ.मनमोहनसिंगांना डेंगीची लागण; प्रकृतीबाबत 'एम्स'कडून माहिती जाहीर

साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या स्फोटांमध्ये 10 जण ठार तर 82 जण जखमी झाले होते. या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यांना या प्रकरणात अटक झाली होती. नंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना 2017 जामीन मंजूर झाला होता. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदारसंघातून उभे राहात काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचा पराभव केला होता. त्यांनी मोठ्या मताधिक्याने हा विजय मिळवला होता.

Pragya Singh Thakur
शशिकलांना ऑस्कर मिळेल पण अण्णाद्रमुकमध्ये स्थान नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीस न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत मिळावी, अशी मागणी अनेक वेळा ठाकूर यांनी केली आहे. असे असताना आता त्या लग्नात नाचत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. हा विवाह समारंभ त्यांच्याच निवासस्थानी झाला होता. त्या वेळी 51 वर्षांच्या ठाकूर या नाचताना दिसल्या होत्या. त्याआधी प्रज्ञा ठाकूर या बास्केटबॉल खेळताना दिसल्या होत्या. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com