भाजपचा खासदार म्हणतो, नादाला लागू नको मी खतरनाक माणूस!

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज दुसऱ्या टप्प्यात 94 मतदारसंघात मतदान होत आहे.
bjp mp nishikant dubey threatens ljp leader rajesh verma in viral audio clip
bjp mp nishikant dubey threatens ljp leader rajesh verma in viral audio clip

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. यातच गोड्डातील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात त्यांनी एका उमेदवाराला थेट ठार मारण्याचीच धमकी दिली आहे. यामुळे राज्यात भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. 

निशिकांत दुबे यांनी लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) उमेदवार राजेश वर्मा यांना मारण्याची धमकी दिली आहे. वर्मा यांनी स्वत:च्याच सोशल मीडियावर ही क्लिप टाकली आहे. यात निशिकांत दुबे म्हणत आहेत की, राजेश वर्माने जाहीर माफी मागितली नाही तर त्याला बरबाद करुन टाकेन. मी खतरनाक माणूस आहे. सोने-चांदी विकून त्या राजेश वर्माने नेतागिरी सुरू केली आहे. त्याने मला शाहनवाज हुसेन अथवा अश्विनीकुमार चौबे समजू नये. त्याने माफी मागितली नाही तर त्याला पकडून मारीन आणि पुढे पाहीन मग काय होते. 

निशिकांत दुबे आणि डॉक्टर नितीश दुबे यांच्यातील संवादाची ही ऑडिओ क्लिप आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर निशिकांत दुबे यांनी सुरूवातीला ती बनावट असल्याचे म्हटले होते. नंतर मात्र, त्यांनी त्या क्लिपमधील आवाज आपलाच असल्याचे कबूल केले. त्यांनी ही क्लिप पूर्ण नसल्याचे म्हटले असून, खूप वेळ आमच्यातील संवाद चालला होता आणि त्यातील काहीच भाग या क्लिपमध्ये आहे, असा दावा केला आहे.  

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  आज सुरू असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com