मोदींची दाढी आहे, तोपर्यंत घर मिळत राहील ; भाजप खासदाराचे अजब विधान

''पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दाढीमध्ये अनेक घरं आहेत. त्यांनी एक वेळा जरी दाढी हलवली तर ५० लाख घरं पडतात,''असे वादग्रस्त विधान जनार्दन मिश्रा (BJP MP Janardan Mishra) यांनी केलं आहे.
मोदींची दाढी आहे, तोपर्यंत घर मिळत राहील ; भाजप खासदाराचे अजब विधान
Narendra Modi, Janardan Mishrasarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या दाढीबाबत वादग्रस्त विधान केल्यानं मध्यप्रदेशातील रीवा येथील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा (BJP MP Janardan Mishra) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. जनार्दन मिश्रा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीमध्ये अनेक घरं आहेत. त्यांनी एक वेळा जरी दाढी हलवली तर ५० लाख घरं पडतात,''असे वादग्रस्त विधान जनार्दन मिश्रा यांनी केलं आहे. ते सुकुवर जैसवली वस्ती येथील रस्ता भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. एका जाहीर सभेत त्यांनी हे अजब विधान केलं आहे.

'पंतप्रधान आवास' योजनेअंतर्गत अनेकांना घर मिळालं. त्यामुळे जोपर्यंत मोदींची दाढी आहे , तोपर्यंत 'पंतप्रधान आवास' या लाभ मिळत राहिल. त्यामुळे तुम्ही मोदींच्या दाढीकडे पाहत राहा, तुम्हाला घर मिळत राहिल. मोदींची दाढी ही अमर आहे, तुमचे घर ही अमर होईल. त्यामुळे मोदींची दाढी पाहत राहा, घर मिळत राहतील.'' असे जनार्दन मिश्रा म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Narendra Modi,  Janardan Mishra
ज्याने मंदिर तोडलं, त्याला तोडण्याची वेळ आलीय ; भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान

मिश्रा यांनी केलेल्या या विधानाला दुजोरा दिला आहे. 'पंतप्रधान आवास' योजनेत घर मिळणार नाही, याबाबत नागरिकांच्या मनात भीती आहे. त्यांना या योजनेत घरे मिळणार आहेत, यासाठी मी हे विधान केले आहे,'' असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. मिश्रा यांनी लोकांना समजावून सांगितले की, जोपर्यंत पीएम मोदी आणि त्यांची दाढी आहे, तोपर्यंत घर मिळत राहील.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in