अयोध्येत राज ठाकरे येवू शकतात.... पण तेथून परत येणे अवघड

Brijbhushan Singh Warning to Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासाठी त्यांनी मोठी तयारीही सुरु केली आहे.
अयोध्येत राज ठाकरे येवू शकतात.... पण तेथून परत येणे अवघड
Raj Thackeray Ayodhya Visit news

Raj Thackeray Ayodhya Visit news

मुंबई : ' राज ठाकरे (Raj Thackeray) प्रचारासाठी अयोध्येत येत आहेत. त्यांची नियत चांगली नाही, जर त्यांना अयोध्येत यायचे असेल तर त्यांनी आपल्या केलेल्या कर्माची माफी मागावी, आणि ते उत्तर भारत दक्षिण भारत असे मुद्दे उपस्थित करणार नाहीत. असे वचन द्यावे. तरच त्यांना अयोध्येच्या जमिनीवर पाय ठेवून देऊन. त्यांनी माफी मागितली नाही, तर ते विमानातून अयोध्येत येतील पण त्यांना अयोध्येच्या जमिनीवर आम्ही पाय ठेवू देणार नाही, त्यांना माफी मागावीच लागेल, असा इशारा भाजप (BJP) खासदार ब्रिजभुषण सिंह (Brijbhushan singh) यांनी दिला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासाठी त्यांनी मोठी तयारीही सुरु केली आहे. मात्र राज ठाकरे यांनी यूपीतल्या जनतेची माफी मागितल्या शिवाय त्यांना अयोध्येच्या मिनीवर पाय ठेवू प्रवेश करुन देणार नाही असा इशारा भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला होता. त्यावर ते अद्यापगही ते कायम आहेत.

Raj Thackeray Ayodhya Visit news
karnataka cm ही ‘पेमेंट सीट’ आहे का ? सिद्धरामय्यांचा सवाल

जितकी तयारी त्यांची सुरु आहे तितकीच आमचीही सुरु आहे. खुप चांगलं स्वागत होईल त्यांचं. माफी मागून आले तर त्याहुन चांगलं स्वागत होईल. आता हे जन आंदोलन झाले आहे. जो त्रास राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना दिला आता त्यांनी त्यांच तोंडांने उत्तर भारतीयांची माफीही मागितली पाहिजे. जर तिकडे ट्रेन बुक होत असतील तर इकडे आम्हीही बुकींग सुरु केलं आहे. असा सूचक इशाराही ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे. राज ठाकरेंनी त्यांची चूक मान्य करावी आणि बिनधास्त अयोध्येत यावे, असंही सिंह यांनी म्हटलं आहे.

जर त्यांनी माफी मागितली नाही तर आपण काय करणार असे विचारले असता ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे अयोध्येत येऊच शकत नाही, मग ते सैन्य घेऊन आले तरीही त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही कार्यकर्ते तर लांबच राहिले. जर ते आले तर त्यांना लाखो उत्तर भारतीयांचे मृतदेह ओलांडून मंदीरात जावे लागेल, राज ठाकरे असतील मुंबईचे पण इथे दबाव टाकून तुम्ही काहीही करु शकत नाही असही सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्या या इशाऱ्यावर मनसे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'सिंह हे दोन्ही बाजूने बोलत आहेत. पण राज ठाकरे यांनी एकदा तारीख दिली की दिली, ते अयोध्येत जाणारच. त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. आज प्रत्येक पक्षाचे नेते ते तिथे जातात, ते काही राजकारण कऱण्यासाठी जात नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते पक्षाची भूमिका स्पष्ट करतील, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.