भाजपला मोठा धक्का; अमित शहांच्या दौऱ्याआधी खासदार ठोकणार पक्षाला रामराम

बाबूल सुप्रियो यांनी मागील वर्षी भाजपला सोडचिठ्ठी देत तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.
BJP MP Arjun Singh Latest Marathi News
BJP MP Arjun Singh Latest Marathi News Sarkarnama

कोलकता : पश्चिम बंगाल (West Bengal) भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांनी घरवापसी करत तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. त्यामध्ये माजी खासदार बाबूल सुप्रियो यांचाही समावेश आहे. आता आणखी एक खासदार भाजपला रामराम ठोकण्याची तयारीत असल्याचे समजते. (BJP MP Arjun Singh Latest Marathi News)

'एएनआय' या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व खासदार अर्जुन सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्षांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ते भाजप सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षात वरिष्ठ पदावर असूनही काम करू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. (BJP MP Arjun Singh likely to join TMC)

BJP MP Arjun Singh Latest Marathi News
मधू इथे अन् चंद्र तिथे! हनुमान चालिसावरून राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला सुनावलं

सिंह म्हणाले, 'मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटून राज्यातील पक्षाच्या स्थितीबाबत माहिती दिली. प्रामाणिक कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. मी उपाध्यक्ष असून काम करू दिले जात नाही.' सिंह हे 2019 मध्ये तृणमूलमधून भाजपमध्ये आले आहेत.

राज्यातील ज्युटच्या प्रश्नावर सिंह हे आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी नुकतीच दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली आहे. या मुद्दावरून राज्यात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी ते तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना रविवारी भेटणार आहेत. पण ही भेट राजकीय असल्याचेही सांगितले जात आहे. पक्षप्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याचे 'एएनआय'च्या वृत्तात म्हटले आहे.

सिंह यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेवर भाजप नेतेही उघडपणे बोलू लागले आहेत. भाजपचे नेते समिक भट्टाचार्य म्हणाले, 'भाजपमध्ये राहायचे की बाहेर पडायचे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.' केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच बंगालच्या दौऱ्यावर येणार असून त्याआधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सिंह हे मागील सहा महिन्यांपासून टीएमसी नेत्यांच्या संपर्कात असल्याचे एका नेत्यानं सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com