ममतांचा भाजपला हादरा; आठ महिन्यातच दुसरा खासदार फोडला

मागील सहा महिन्यांपासून हे खासदार तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात होते.
MP Arjun Singh joins TMC
MP Arjun Singh joins TMCSarkarnama

कोलकता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) भाजपला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हादरा दिला आहे. खासदार अर्जुन सिंह यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला. आठ महिन्यांपूर्वील बाबूल सुप्रियो यांचीही तृणमूलमध्ये घरवापसी झाली आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर आल्याची चर्चा आहे. (BJP MP Arjun Singh Joins TMC)

अर्जुन सिंह हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्षही होते. 2019 च्या निवडणुकीपुर्वी ते तृणमूलमधून भाजपमध्ये गेले होते. पण मागील काही दिवसांपासून ते पक्षांतर्गत कुरघोडीवरून नाराज होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्षांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ते भाजप सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मागील सहा महिन्यांपासून ते तृणमूलच्या संपर्कात होेते, अशीही चर्चा होती. (MP Arjun Singh latest Marathi News)

MP Arjun Singh joins TMC
Breaking : अखेर ठाकरे सरकारनं करून दाखवलं! राज्यात पेट्रोल अन् डिझेलच्या दरात कपात

अखेर रविवारी त्यांनी तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मागील आठ महिन्यांत भाजपला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. बाबूल सुप्रियो यांनी मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना आमदारकीचं तिकीट देण्यात आलं होतं. पोटनिवडणुकीत ते निवडूनही आले आहेत.

दरम्यान, पक्षातील वादावर बोलताना सिंह म्हणाले होते की, 'मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटून राज्यातील पक्षाच्या स्थितीबाबत माहिती दिली. प्रामाणिक कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. मी उपाध्यक्ष असून काम करू दिले जात नाही.'

राज्यातील ज्युटच्या प्रश्नावर सिंह हे आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी नुकतीच दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली होती. या मुद्दावरून राज्यात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याच मुद्दावर ते बॅनर्जी यांना भेटणार असल्याचे सांगितले जात होते. पण त्यांनी थेट भाजपला रामराम ठोकल्याने प्रदेश भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com