भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर; माजी मुख्यमंत्री अडचणीत आले अन् आमदार आनंदले

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगळूरसह इतर ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते.
भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर; माजी मुख्यमंत्री अडचणीत आले अन् आमदार आनंदले
BJP

बंगळूर : प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax) अधिकाऱ्यांनी बंगळूरसह इतर ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. यात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांचे (B.S.Yediyurappa) स्वीय साहाय्यक एम.आर. उमेश (M.R.Umesh) यांच्या घर व कार्यालयावरही छापा घालण्यात आला होता. यामुळे येडियुरप्पा अडचणीत आल्याचे मानले जात आहे. या छाप्याचे भाजप आमदारांनी स्वागत केल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या छाप्यावर बोलताना आमदार एच. विश्वनाथ म्हणाले की, हे स्वागतार्ह पाऊल आहे. येडियुरप्पांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांनी सरकारच्या अनेक विभागात केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी मी केल्या होत्या. तब्बल 21 हजार 473 कोटी रुपयांच्या निविदा अर्थ विभाग आणि राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय देण्यात आल्या होत्या. विजयेंद्र आणि त्यांचे सहकारी या निविदांचे वाटप करीत होते. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर भद्रा कालवा प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत मी बोललो होते.

निविदा वाटपातून विजयेंद्र यांनी 2 हजार कोटी रुपये मिळवले. एवढेच काय खुद्द पंतप्रधान नरेंद मोदींनीही येडियुरप्पांची खुर्ची विजयेंद्र यांच्यामुळेच गेल्याचे सांगितले होते. येडियुरप्पांचे मुख्यमंत्री पद जाण्यास त्याचा मुलगा कारणीभूत आहे. आता छापे पडलेला उमेश हा विजयेंद्रचाच शिष्य आहे, असाही गौप्यस्फोट विश्वनाथ यांनी केला.

जलसंपदा विभागातील निविदा वाटपात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी प्राप्तिकर विभागाने मध्यस्थ, कंत्राटदार आणि कंपन्यांवर छापे टाकले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या बंगळूर आणि गोवा कार्यालयातील तीनशेहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे छापे घातले. जलसंपदा विभागातील सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल छापे घालण्यात आले. जलसंपदा विभागाची कंत्राटे देताना मोठा भ्रष्टाचार होत आहे. यात येडियुरप्पांची पीए उमेश हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. उमेश यांनी या माध्यमातून अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचे कमिशन गोळा केल्याचाही संशय आहे.

BJP
मुख्यमंत्र्यांचे पद जाताच 'पीए' बनला बसचा कंडक्टर कम ड्रायव्हर!

उमेश यांच्यावरील छाप्याने येडियुरप्पा हे नाराज झाले आहेत. उमेश यांच्यासह काही कंत्राटदार, चार्टर्ड अकाउंटंट, बांधकाम साहित्याचे व्यापारी आणि येडियुरप्पांचे पुत्र बी.विजयेंद्र यांच्या जवळच्या काही व्यक्तींवर छापे घालण्यात आले. बंगळूरसह, बागलकोट, तुमकूर येथे छापे घालण्यात आले. यात कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत.

BJP
नवीन मुख्यमंत्र्यांचीही पडणार विकेट? सिद्धूंची मोहीम सुरू (व्हिडीओ व्हायरल)

येडियुरप्पांचे पीए उमेश हे शिमोगा जिल्ह्यातील आयनूरचा रहिवासी आहेत. ते सुरवातीला बीएमटीसीमध्ये कंडक्टर म्हणून काम करीत होते. यलहंका येथील पुट्टेनहळ्ळी बीएमटीसी डेपोत ते काम करीत होते. नंतर त्यांनी आमदार अय्यनूर मंजुनाथ यांचे स्वीय सहायक म्हणून काही काळ काम करीत होते. येडियुरप्पांचे स्वीय सहायक म्हणून ते 2012 पासून काम करीत होते. विजयेंद्र यांचेही ते निकटवर्ती होते. उमेश यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in