असंही राजकारण! पतीमुळं गेली भाजपच्या महिला आमदारांची मंत्रिपदाची संधी

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली असली तरी एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
Deviya Rane and Jennifer Monserrate
Deviya Rane and Jennifer Monserrate Sarkarnama

पणजी : गोव्यात भाजपने (BJP) सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याचवेळी भाजप नेते विश्वजित राणे आणि बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मात्र, या दोन नेत्यांमुळे भाजपला मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला संधी देता आलेली नाही. भाजपच्या केवळ दोन महिला आमदार निवडून आल्या असून, त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या गळ्यात टाकली आहे. सावंत यांच्यासोबत आज 8 मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. यात विश्वजीत राणे (Vishwajit Rane), मॉविन गुदिन्हो, आमदार रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र भाजपकडून यात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. गोव्याच्या मंत्रिमंडळाची क्षमता 11 आहे. मंत्रिमंडळात अजून 3 जागा शिल्लक आहेत. यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) आणि अपक्षांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मगोपच्या सुदिन ढवळीकरांसह अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

Deviya Rane and Jennifer Monserrate
भाजपचे आमदार अडचणीत येताच अमित शहांनी थेट राज्यपालांनाच दिल्लीत बोलावून घेतलं

भाजपच्या केवळ दोन महिला आमदार निवडून आल्या असून, त्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यात भाजपच्या जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserrate) आणि दिव्या राणे (Deviya Rane) या दोन महिला आमदार आहेत. या दोघीही मंत्रिपदाच्या दावेदार होत्या. बाबूश यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात या मागील सरकारमध्ये मंत्री होत्या. मात्र, या वेळी त्यांना मंत्रिपद देण्यात आलेेले नाही. याचबरोबर विश्वजीत राणेंच्या पत्नी दिव्या राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. यामुळे दोघींचे पती मंत्री झाल्याने त्यांच्या मंत्रिपदावर फुली मारली गेली आहे.

Deviya Rane and Jennifer Monserrate
न्यायालयाचा दणका! शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुख्यमंत्रिपदासाठी विश्वजीत राणे हे स्पर्धेत होते. त्यांचा मंत्रिमडळात समावेश झाला आहे. त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना यामुळे डावलण्यात आले आहे. हाच प्रकार जेनिफर मोन्सेरात यांच्याबाबत घडला आहे. बाबूश यांना मंत्रिपद मिळाल्याने त्यांच्या पत्नीला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. या दोघींपैकी एकीला मंत्रिपद दिल्यास भाजप नेतृत्वाची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे होती. दोघींपैकी कुणाला डावलणार, असा प्रश्नही निर्माण झाला होता. याचबरोबर मंत्रिमंडळात पती आणि पत्नीचा समावेश केल्यास घराणेशाहीचा शिक्का सरकावर बसला असता. ते भाजपला परवडणारे नव्हते. यामुळे अखेर पक्ष नेतृत्वाने एकाही महिलेला संधी दिलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com