कोरोना संकट हाताळण्यात मुख्यमंत्री योगी अपयशी! भाजप आमदाराचा घरचा आहेर

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णसंख्या वाढली असून, राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र आहे.मंत्री व आमदारांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे.
bjp mla surendra singh criticizes yogi adityanath over covid handling
bjp mla surendra singh criticizes yogi adityanath over covid handling

लखनौ : देशातील कोरोनाची दुसरी लाट आली आहे. उत्तर प्रदेशात रुग्णसंख्या वाढली असून, राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र आहे. राज्यात रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडल्याचे चित्र आहे. यामुळे उद्विग्न झालेल्या भाजप आमदाराने थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अपयशावर बोट ठेवले आहे. मंत्री व आमदारांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. 

उत्तर प्रदेशातील बैरीया मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी सरकारी व्यवस्था निकामी झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपचे मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. तरीही त्यांना उपचार मिळत नसल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. यापेक्षा सरकारच्या अपयशाचे दुसरे उदाहरण कुठलेच असणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाबूशाहीला हाताशी धरुन कोरोना महामारीलाचा सामना करण्याचा प्रयत्न केला. तो पूर्णपणे फसला आहे. उपचार न मिळाल्याने मंत्री आणि आमदारांचा मृत्यू होत आहे. सरकारी व्यवस्था ही लोकनियुक्त लोकप्रतिनिधींना केंद्रस्थानी ठेवून असायला हवी. 

उत्तर प्रदेशात आतपर्यंत 12 लाख 17 हजार 955 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 12 हजार 241 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत उत्तर प्रदेशात कोरोनामुळे 295 जणांचा मृत्यू झाला आहे. 

देशात दर तासाला कोरोनामुळे 145 जणांचा मृत्यू 
देशात आता दरतासाला सुमारे 145 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 87 लाख 62 हजार 976 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 8 हजार 330 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 86 हजार 452 रुग्ण सापडले असून, 3 हजार 498 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

मागील 24 तासांत देशात 3 हजार 498 मृत्यू झाले आहेत. यात महाराष्ट्र 771, दिल्ली 395, उत्तर प्रदेश 295, कर्नाटक 270, छत्तीसगड 251, गुजरात 180, राजस्थान 158, झारखंड 145, पंजाब 137 आणि तमिळनाडूतील 107 मृत्यूंचा समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com