पालिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी भाजपच्या आमदारानं केलं नगरसेविकेचं अपहरण

भाजपच्या आमदाराने एका नगरसेविकेचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे खळबळ उडाली आहे.
BJP
BJPSarkarnama

बंगळूर : भाजपच्या (BJP) आमदाराने एका नगरसेविकेचे (Corporator) अपहरण केल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे खळबळ उडाली आहे. या आमदाराचे नाव शिवराज पाटील असे असून, त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाटील हे रायचूर मतदारसंघाचे आमदार (MLA) असून, रायचूर पालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधीच नगरसेविकेचे त्यांनी अपहरण केले आहे.

कर्नाटकातील सत्ताधारी भाजपच्या आमदाराने असा धक्कादायक प्रकार केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. आमदार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नगरसेविका शायनाज बेगम यांचे एका खासगी रुग्णालयातून अपहरण केले. या प्रकरणी बेगम यांचे पुत्र एम.डी.अली यांनी तक्रार दिली आहे. रायचूर पालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बेगम यांना मतदान करता येऊ नये, यासाठी त्यांचे अपहरण आमदार पाटील यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

BJP
भाजपचं मंत्रिमंडळ कोट्यधीशांचं अन् सर्वांत श्रीमंत बाबूश मोन्सेरात; चौघांवर फौजदारी गुन्हेही

बेगम या वॉर्ड क्रमांक 26 मधून निवडून आल्या आहेत. त्या 26 मार्चपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यासोबत रुग्णालयात त्यांच्या सासू खाजाबी आणि दुसरा मुलगा मोहम्मद आलम हे होते. अली यांनी काल त्यांच्याशी संपर्क साधला असता तिघांचेही मोबाईल स्वीच ऑफ लागले. त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन विचारणा केली असता एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून तिघांना नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती कार आमदार पाटील यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. अली यांनी आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उत्तर दिले नाही.

BJP
निवडणूक आयोगाचा दणका! सत्ताधारी आमदार आला अडचणीत

याबद्दल बोलताना अली म्हणाले की, रायचूर पालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी माझ्या आईचे अपहरण करण्यात आले आहे, तिला आणि माझ्या कुटुंबीयांना काही बरेवाईट झाल्यास भाजपचे आमदार शिवराज पाटील जबाबदारी असतील. माझ्या कुटुंबीयांची तातडीने सुटका करण्यात यावी. भाजपचे आमदार पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर कायदेशीवर कारवाई पोलिसांनी करावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com