भाजपची पडझड सुरूच..आणखी एक आमदार विरोधी पक्षाला जाऊन मिळाला!

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.
Akhilesh Yadav and Radha Krishna Sharma
Akhilesh Yadav and Radha Krishna SharmaSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुढील दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक पक्षांकडून इतर पक्षांचे आमदार फोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. यात आता समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी भाजपला (BJP) मोठा धक्का दिला आहे.

भाजपचे राधाकृष्ण शर्मा यांनी आज भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश केला. बदायूँ जिल्ह्यातील बिल्सी मतदारसंघातील ते आमदार आहेत. अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून भाजपमध्ये गळती सुरू झाली आहे. भाजपकडून तिकिट कापले जाण्याच्या संकेत मिळताच अनेक नेते पक्षाला रामराम करू लागले आहेत. आगामी काळातही भाजपमधून समाजवादी पक्षात इनकमिंग सुरू राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Akhilesh Yadav and Radha Krishna Sharma
भाजपच्या दोन बड्या नेत्यांच्या मुलांनी वाढवली फडणवीसांची डोकेदुखी

काही दिवसांपूर्वी भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या बालेकिल्ल्यातील अनेक ब्राह्मण नेत्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. भाजपच्या बहराईच मतदारसंघातील आमदार माधुरी वर्मा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. याचबरोबर पूर्वांचलमधील अतिशय महत्वाचा ब्राह्मण चेहरा मानले जाणारे राकेश पांडे यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. बहुजन समाज पक्षाचे खासदार रितेश पांडे यांचे ते पिता आहेत. राकेश पांडे हे माजी खासदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुलाला पुढे करीत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता.

Akhilesh Yadav and Radha Krishna Sharma
काँग्रेसची ताकद वाढली..अपक्ष आमदारांनी हातात घेतला हात!

अखिलेश यादव यांनी भाजपला शह देण्यासाठी ब्राह्मण नेत्यांना पक्षात ओढून घेण्यास सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पूर्वांचलमधील दिग्गज ब्राह्मण नेते पंडित हरीशंकर तिवारी हे समाजवादी पक्षात आले आहेत. ते गोरखपूरमधील चिल्लूपार मतदारसंघातून सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचा एक मुलगा बहुजन समाज पक्षाचा आमदार आहे तर दुसरा मुलगा माजी खासदार असूनही तो समाजवादी पक्षात दाखल झाला आहे. गोरखपूर विभागातील खलिलाबाद मतदारसंघातील भाजपचे आमदार दिग्विजय नारायण चौबे हे नुकतेच अनेक ब्राह्मण नेत्यांसह समाजवादी पक्षात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in