थोबाडीत खाल्लेला आमदार म्हणतोय, ती तर होती एक प्रेमळ चापट!

ज्येष्ठ नागरिकाने आमदाराला कानाखाली मारल्याचा व्हिडीओ व्हायरला झाला असून, यावरून गदारोळ सुरू आहे.
BJP MLA Pankaj Gupta slapped by senior citizen
BJP MLA Pankaj Gupta slapped by senior citizenSarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी भाजपकडून (BJP)निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. पण आता पक्षाच्या आमदारालाच एका ज्येष्ठ नागरिकाने स्टेजवर येऊन थोबाडीत मारल्याचा प्रकार घडला आहे. यावर या आमदाराने धक्कादायक खुलासा केला असून, यासाठी त्याने ज्येष्ठ नागरिकाला सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली.

भाजपचे आमदार पंकज गुप्ता (Pankaj Gupta) यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. गुप्ता हे एका पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्टेजवर एक ज्येष्ठ नागरिक आला आणि त्याने थेट गुप्तांच्या थोबाडीत लगावली. हे पाहून भाजप कार्यकर्ते धावत आले आणि त्या ज्येष्ठ नागरिकाला पकडले. त्यांनी त्याला याबद्दल विचारणा केली. नंतर ते त्याला स्टेजवरून खाली घेऊन गेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा ज्येष्ठ नागरिक शेतकरी आहे.

भाजप आमदार गुप्ता यांनी थोबाडीत मारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकासोबत पत्रकार परिषद घेऊन आता खुलासा केला. मी आमदारांना मारले नाही. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना काही गोष्टी विचारले. त्यानंतर त्यांना बेटा म्हणून गालावर प्रेमाने चापट मारली, असे त्या ज्येष्ठ नागरिकाने म्हटले आहे.

आमदार गुप्तांनी म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिकाने थोबाडीत मारली नव्हती तर गालावर हळूवार थोपटले होते. विरोधकांनी राजकीय हेतूने या गोष्टीला वेगळा रंग दिला आहे. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी विरोधी आहेत हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. हा ज्येष्ठ नागरिक मला पित्यासमान आहे. आधीही ते माझ्या गालावर प्रेमाने हळूवार चापट द्यायचे.

BJP MLA Pankaj Gupta slapped by senior citizen
निवडणुकीआधी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपनं टाकला डाव!
BJP MLA Pankaj Gupta slapped by senior citizen
ज्येष्ठ नागरिकाने स्टेजवर येऊन थेट भाजप आमदाराच्या कानाखाली लगावली

दरम्यान, देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच निवडणुकांची रणधुमाळी सुरूअसल्याने चिंता व्यक्त होत आहे. यामुळे निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. त्यावेळी भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्यास विरोध केला होता. यामुळे आयोगाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी ३.३० वाजता मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हे निवडणुकांच्या तारखांची घोषणा करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com