भाजप नेत्याला 29 वर्षांपूर्वीचं प्रकरण भोवलं; आमदारकी झाली रद्द

बनावट गुणपत्रिकेच्या आधारावर पुढील वर्गात प्रवेश घेतल्याच्या प्रकरणात त्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे.
Indra Pratap Tiwari
Indra Pratap TiwariSarkarnama

अयोध्या : अयोध्या (Ayodhya) जिल्ह्यातील गोसाईगंज मतदारसंघाचे भाजपचे (BJP) आमदार इंद्र प्रताप उर्फ खब्बू तिवारी (Indra Pratap Tiwari) यांना 29 वर्षांपूर्वीचं प्रकरण भोवलं आहे. या प्रकरणात त्यांना न्यायालयानं पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांना आमदारकीवर पाणी सोडावे लागले आहे. ही शिक्षा झाल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

फैजाबाद येथील अपर सत्र न्यायालयाने 18 ऑक्टोबर 2021 रोजी खब्बू यांच्यावरील फसवणूकीच्या प्रकरणात तीन वर्ष तुरूंगवास व सहा हजार रुपये दंडची शिक्षा ठोठावली आहे. तर अपहऱणाच्या प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपयांचा दंड केला आहे. त्यानंतर विधानसभेचे प्रमुख सचिवांनी सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशानुसार तिवारी यांच्या सदस्यता रद्द करत त्यांचे पद रिक्त घोषित केले.

Indra Pratap Tiwari
साम-दाम-दंड-भेद सर्व करून झालं, पण परबांच्या हाती काही लागेना!

तिवारी यांना शिक्षा झालेलं प्रकरण 1992 मधील आहे. साकेत महाविद्यालयाचे प्राचार्य यदुवंश त्रिपाठी यांनी 18 फेब्रुवारी 1992 रोजी तिवारी यांच्याविरोधात बनावट गुणपत्रिके्या आधारे प्रवेश घेण्याची तक्रार पोलिसांत केली होती. त्यानंतर तिवारी यांच्यावरील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018 मध्ये हे प्रकरण सत्र न्यायालयात आले होते. दरम्यानच्या काळात त्रिपाठी यांचा मृत्यू झाला. तसेच अन्य काही साक्षीदारांचाही मृत्यू झाला.

पण इतर साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरत न्यायालयाने तिवारी यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली. तिवारी यांनी 1990 मध्ये बीएसस्सीच्या प्रथम वर्षाच्या गुणपत्रिकेत बदल करून दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तिवारी यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तिवारी हे 2007 मध्ये अयोध्या येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर तर 2012 मध्ये गोसाईगंड मतदारसंघातून बसपाच्या तिकीटावर निवडणूक हरले होते. त्यानंतर 2017 मध्ये भाजपच्या तिकीटावर ते विजयी झाले. त्यांनी सपाचे उमेदवार बाहूबली अभय सिंह यांचा पराभव केला होता. महाविद्यालयामध्ये विद्यार्थी निवडणुकांत ते सक्रीय होते. तिथून त्याचा राजकारणात प्रवेश झाला होता. दोन वेळा ते जिल्हा परिषदेचे सदस्यही होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com