भाजप आमदार म्हणतोय, येडियुरप्पा, बोम्मईंपेक्षा कुमारस्वामी परवडले!

बोम्मई यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर महिन्याच्या आतच त्यांच्यासमोरील अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.
BJP MLA compares yediyurappa and bommai to h d kumaraswmay
BJP MLA compares yediyurappa and bommai to h d kumaraswmay

बंगळूर : मुसळधार पावसामुळे कर्नाटकात (Karnataka) मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना अद्याप मिळत नसल्याचे चित्र आहे. या विरोधात सत्तारुढ भाजपचे (BJP) आमदार एम.पी.कुमारस्वामी (M.P.Kumarswamy) यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांची तुलना धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (JDS) नेते व माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्याशी केली आहे. 

कर्नाटकात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठा पूर आला होता. कुमारस्वामी यांचा मतदारसंघ मुडिगेरे आहे. मतदारसंघातील पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, ही मागणी त्यांनी केली आहे. शिमोग्यात पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यात आली. कारण माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि ग्रामविकास मंत्री के.एस.ईश्वरप्पा यांचा तो जिल्हा आहे, हे यामागे कारण असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

शिमोग्यात मदत मिळते तर पश्चिम घाटातील 900 मिलिमीटर पर्जन्यमान असलेल्या मुडिगेरेला वेगळा न्याय का? असा सवाल कुमारस्वामी यांनी केला आहे. जेडीएसचे कुमारस्वामी हे यापेक्षा अधिक मदत करणारे मुख्यमंत्री होते असे सांगून कुमारस्वामी म्हणाले की, मी 2018 मध्ये मुख्यमंत्री असलेल्या कुमारस्वामींना मदत केली होती. त्यावेळी त्यांनी निधी तर दिलाच उलट माझ्याशी संपर्क साधून इतर मदत हवी का, अशी विचारणाही केली. 

कुमारस्वामींनी म्हटले आहे की, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) अंतर्गत देण्यात येणाऱ्या मदतीसाठी मुडिगेरेचा समावेश सरकारने करावा. पावसामुळे पिके, जमीन आणि घरांचे नुकसान झाले आहे अशा कुटुंबांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मदत करावी. 2019 मध्ये आलेल्या मुसळधार पुरात सहा जण वाहून गेले होते. त्यांचे मृतदेह आम्ही दोन आठवडे शोधत होते. त्यावेळी घरे आणि कॉफीचे मळे वाहून गेलेल्यांना नुकसान भरपाईची मागणी आम्ही केली होती. परंतु, मागील वर्षी पुन्हा पूर आला तरी त्यांना मदत मिळाली नाही. 

कर्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई हे आले आहेत. बोम्मई यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर महिन्याच्या आतच त्यांच्यासमोरील अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांनी त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. यातच खातेवाटपात महत्वाचे खाते न मिळालेले मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com