आमदार यतनाळांनी मुख्यमंत्री येडियुरप्पांची लायकी काढली अन्...

कर्नाटकात सत्ताधारी भाजपमध्ये सध्या जोरदार संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात बसनगौडा पाटील-यतनाळ यांनी आघाडी उघडली आहे.
bjp mla basanagouda patil yatnal confronts karnataka cm b s yediyurappa
bjp mla basanagouda patil yatnal confronts karnataka cm b s yediyurappa

बंगळूर : कर्नाटकमधील भाजप आमदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांची लायकी भाजपचे ज्येष्ठ नेते बसनगौडा पाटील-यतनाळ यांनी काढली होती. यावरुन दोघांमध्ये जोरदार जुंपली होती. पक्षातील काही आमदारांना सरकारकडून पुरेसा निधी दिली जात नसल्याचा मुद्दा या वादाच्या केंद्रस्थानी होता. अखेर सरकारने आमदारांना अतिरिक्त निधी देण्याचे मान्य केले आहे. 

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मंत्र्यांसह भाजपच्या आमदारांची बैठक नुकतीच घेतली होती. या बैठकीत काही आमदारांना विकासकामांसाठी जाणीवपूर्वक कमी निधी जात असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. या वेळी संतप्त झालेल्या यतनाळ यांनी थेट आवाज चढवून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना धारेवर धरले. यामुळे येडियुरप्पांचाही पारा चढला. दोन्ही नेत्यांमध्ये बैठकीतच जुंपली. अखेर काही नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोघेही शांत झाले. 

या बैठकीतील भांडणानंतर सरकारने आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. चालू वर्षाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात आमदारांना अतिरिक्त 25 कोटी रुपयांचा निधी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. 

दरम्यान, या सर्व गदारोळात पक्षाचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांनी यतनाळ यांना इशारा दिला आहे. मात्र, यतनाळ यांची पार्श्वभूमी पाहता ते गप्प बसतील, असे दिसत नाही. यतनाळ हे तडजोड न करणारे नेते मानले जातात. याधीही त्यांनी उघडपणे येडियुरप्पा आणि सरकारला घरचा आहेर दिला होता. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेच यतनाळ यांनी येडियुरप्पांना शह देण्यासाठी बळ दिल्याची चर्चा सुरू आहे. यतनाळ हे येडियुरप्पांच्या जागी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशीही चर्चा आहे. 

यतनाळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले नेते आहेत. ते फायरब्रँड हिंदुत्ववादी नेते असून, लिंगायत समाजाचे आहेत. ते केंद्रात मंत्रीही होते. कर्नाटकात 2019 मध्ये आलेल्या पुरावेळी केंद्र सरकारकडून वेळीच मदत मिळाली नाही म्हणून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही दोषी ठरवले होते. त्यांना त्यावेळी कारणे दाखव नोटीसही बजावण्यात आली होती. आताही त्यांनी अशीच नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम यतनाळ यांच्यावर झालेला अद्याप तरी दिसत नाही. 

राज्यात भाजपला येडियुरप्पा यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. येडियुरप्पा यांना दुखावणे भाजप नेतृत्वाला परवडण्यासारखे नाही. यातच त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील, अशी हमीही नुकतीच पक्ष नेतृत्वाने दिली आहे. या परिस्थितीत यतनाळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडून त्यांना आव्हान दिले आहे. यामुळे यतनाळ यांना पक्ष नेतृत्वानेच पुढे केल्याची चर्चा सुरू आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com