महाराष्ट्र-हरियाणामधील संपूर्ण निवडणूक रद्द करा : भाजपच्या मागणीने 'मविआ'च्या पोटात गोळा

Rajya Sabha Election | भाजपची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
Shivsena Chief Uddhav Thackeray
Shivsena Chief Uddhav ThackeraySarkarnama

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह, राजस्थान, कर्नाटक आणि हरियाणामध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. मात्र महाराष्ट्र (Maharashtra) आणि हरियाणा (Harayana) या राज्यांमधील मतमोजणीला मतदान संपून तब्बल ३ तास उलटल्यानंतरी सुरुवात झालेली नाही. भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ३ मतांवर आणि हरियाणामधील काँग्रेसच्या २ मतांवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. जो पर्यंत या मतांवरील आक्षेपांवरील सुनावणी पूर्ण होवून निकाल येत नाही तोपर्यंत मतमोजणीला सुरुवात होवू शकणार नाही.

अशातच आता भाजपने (BJP) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे संपूर्ण निवडणूकच रद्द करावी अशी मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाळ व पक्षनेते ओम पाठक यांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच तळ ठोकून आहेत. भाजपच्या या मागणीनंतर निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सुरू करू नका, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिल्लीतून देण्यात आले.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आपल्या मतपत्रिका मतदान करण्याआधी आपल्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींच्या व्यतिरिक्त इतरांना जाहीरपणे दाखविल्या, त्यामुळे यांची मते संपूर्ण बाद करावीत अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली होती. हरियाणात देखील कॉंग्रेसचे बी. बी. बात्रा आणि किरण चौधरी यांनी मतदानाआधी आपल्या मतपत्रिका इतरांना दाखविल्या होत्या, असा आक्षेप भाजपने नोंदविला आहे. दोन्ही राज्यांतील हे प्रकार निवडणूक प्रक्रियेचे सरळसरळ उल्लंघन असल्याचा आक्षेप भाजप शिष्टमंडळाने घेतला होता.

भाजपने हा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाकडेही नोंदविला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने हे आक्षेप फेटाळले हेाते. राज्य भाजपने यासंदर्भातील व्हिडिओ चित्रीकरणाचे सादरीकरण केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सादर केले आहे. या पाचही मतदारांचे अशा प्रकारचे वर्तन हे सरळसरळ लोकप्रतिनिधी कायद्यातील राज्यसभा निवडणूक, मतदान व मतमोजणी कायदा आणि १९६१ मधील निकालाचे सरळसरळ उल्लंघन ठरते असा दावा भाजपने केला आहे. पक्षाने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कागदपत्रेही सादर केली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com