भाजप आमदाराच्या क्रॉस व्होटींगमुळं राजकीय गणित बिघडलं! पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल

भाजप आमदाराच्या क्रॉस व्होटींगनंतर नेतृत्वाकडून प्रदेशाध्यक्षांना आदेश
Satish Poonia
Satish Poonia Sarkarnama

जयपूर : राजस्थानमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या (BJP) आमदारांची मते देताना मोठा गोँधळ घातला आहे. यातील एका आमदाराने काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराला मतदान केल्यानं खळबळ उडाली आहे. याचबरोबर भाजपच्या दुसऱ्या आमदारानं त्याचं मत दाखवल्यानं वाद निर्माण झाला आहे. ही दोन मते बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे भाजपच्या पाठिंब्यावर मैदानात उतरलेले उमेदवार अडचणीत आले आहेत. याची गंभीर दखल दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. (Rajya Sabha Election News)

भाजपच्या आमदार शोभारानी कुशवाह यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केले. यामुळे त्यांचे मत बाद करण्यात आले आहे. भाजपच्या दुसऱ्या आमदार सिद्दी कुमारी यांना मत देताना गोंधळ घातला. भाजप पुरस्कृत सुभाष चंद्रा यांना मत द्यायचे होते. प्रत्यक्षात त्यांनी भाजपचे उमेदवार घनश्याम तिवारी यांना मतदान केले. याचवेळी भाजपचेच आमदार कैलास मीना यांनी मत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना दाखवल्याचा आक्षेप काँग्रेसनं घेतला आहे. यामुळे त्यांचेही मत बाद होण्याची शक्यता आहे. या सर्व गोंधळाचा फटका चंद्रा यांना बसेल, असे मानले जात आहे. या सर्व घडामोडींवर पक्षश्रेष्ठींनी कठोर भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणात राज्यातील काही नेत्यांवर कारवाई केली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

Satish Poonia
क्रॉस व्होटींग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार नाही! पक्षप्रमुखांनी स्पष्टच सांगितलं

राजस्थानमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) मैदानात उतरले आहेत. राजस्थानमध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) चार जागा आहेत. यातील दोन जागा काँग्रेस आरामात जिंकू शकते तर भाजपला एक जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. तिवारी यांच्या बाहेरचा असा शिक्का राज्यातील काँग्रेस नेते मारत आहेत. तिवारींच्या उमेदवारीबद्दल पक्षातील नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. यातच आता भाजपने सुभाष चंद्रा यांना पाठिंबा देत मैदानात उतरवून काँग्रेसला धक्का दिला आहे. चंद्रा हे झी माध्यम सूमहाचे मालक असून, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

Satish Poonia
क्रॉस व्होटींग करणारा विरोधी पक्षाचा आमदार म्हणाला, आय लव्ह काँग्रेस!

चंद्रा यांच्या एंट्रीमुळं राज्यसभेच्या चार जागांसाठी आता राजस्थानमध्येे आता पाच उमेदवार मैदानात आहेत. माजी मंत्री घनश्याम तिवारी हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असे दोन गट आहेत. काँग्रेसने तिवारी यांच्यासह प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं दिलेले हे तिन्ही उमेदवार राज्याबाहेरील असल्यानं आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचाच फायदा घेण्याच्या हेतूने भाजपने राज्यसभेसाठी चंद्रा यांना पाठिंबा जाहीर करून त्यांना निवडणुकीत उतरवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com