राज्यसभेची सहावी जागा चुरशीची : भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीतील आयात नेत्यांचे पत्ते पिसणार

राज्यसभेच्या (RajyaSabha) सहाव्या जागेवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
BJP, Rajya Sabha Election Latest Marathi News
BJP, Rajya Sabha Election Latest Marathi Newssarkarnama

नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) वतीने राज्यसभेसाठी (RajyaSabha) दुसऱ्या जागेसाठी सध्याचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुधदे की अन्य कोणा कार्यकर्त्याला संधी द्यायची याचा निर्णय राज्य नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेणार, असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजपने तिसरी जागा लढविण्याचे ठरविल्यास तेथे कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून (NCP) भाजपमध्ये आलेल्या एका नेत्याच्या नावावर विचार सुरु असल्याची माहिती आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविणे भाजपसाठी अपरिहार्य आहे. काँग्रेसतर्फे महाराष्टातून एकमेव जागेसाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह मिलिंद देवरा व संजय निरूपम यांच्या नावावर काँग्रेस हायकमांड गंभीरपणे विचार करत आहे. चिदंबरम यांना तमिळनाडुतून संधी मिळाली तर काँग्रेसतर्फे महाराष्ट्रातील नेत्याला संधी मिळू शकते.

BJP, Rajya Sabha Election Latest Marathi News
Sarkarnama-Cricketnama : मुंडे, पटोले, विश्वजित, नार्वेकर भिडणार मैदानावर

दरम्यान, राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने उत्तर प्रदेशासाठीची संभाव्य उमेदवार यादी दिल्लीत मागवून घेतली आहे. यात सपातून आलेले नरेश आगरवाल, माजी भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी, प्रदेश महामंत्री प्रियांका रावत आदी नव्या चेहऱ्यांना यंदा स्थान मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यातील ११ पैकी ७ ते ८ जागा भाजप जिकू शकणार आहे. त्यादृष्टीने पक्षाने एक संभाव्य यादी तयार केली आहे. १० जून रोजी राज्यसभा निवडणूक आहे. उमेदवारी भरण्याच्या एक दिवसआधी भाजप महत्वाच्या उमेदवारंची नावे जाहीर करेल असे पक्षसूत्रांनी सांगितले.

राज्यसभेबाबतच्या नावांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्यावरुन परतल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. राज्यसभा उमेदवार निवडताना मोदी-शहा केवळ जुलैतील राष्ट्रपती निवडणूकच नव्हे तर २०२४ मधील लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने उमेदवारांची निवड करणार हही स्पष्ट आहे. उत्तर प्रदेश विधानसभा व विधान परिषदेतील संख्याबळ पहाता भाजपला ८ व सपाला ३ जागा सहज मिळू शकतात. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांत समन्वय झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुकाणू समितीची बैठक नुकतीच झाली. तीत एक संभाव्य यादी तयार करून दिल्लीला पाठविण्यात येणार आहेत व त्यानंतर योगी यांच्याशी चर्चा करून भाजप अंतिम उमेदवार जाहीर करेल. सध्याच्या खासदारांपैकी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचीही उमेदवारी पक्की समजली जाते. उर्वरीत पाच जागांसाठी सध्याचे शिवप्रताप शुक्ला, संजय सेठी, सुरेंद्र नागर, जयप्रकाश सेठी, सैय्यद जफर इस्लाम या खासदारांचीही नावे राज्य सुकाणू समितीने कायम ठेवली असून अंतिम निर्णय केद्रीय नेतृत्वावर सोडण्यात आला आहे.

BJP, Rajya Sabha Election Latest Marathi News
Shivsena : राज्यसभेची संधी पुन्हा हुकली, तरी खैरेंनी केले उद्धव ठाकरेंचे अभिनंदन..

दरम्यान, सपाकडून सध्याचे रेवतीरमण सिंह यांच्यासह तीनही खासदार पुन्हा राज्यसभेवर येणार नाहीत. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कपील सिब्बल यांच्यासह तीन नवीन चेहरे राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय सपा नेते खिलेश यादव यांनी घेतला आहे. मात्र, खुद्द कॉंग्रेसची पाटी यावेळी यूपीतून कोरीच रहाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com