फेसबूक पोस्ट शेअर करुन भाजप नेत्यानं संपवलं आयुष्य..

श्वेता सिंह गौर (shweta singh) यांचे पती दीपक सिंह गौर हेही भाजपचे नेता आहेत. ते सध्या फरार आहेत
Shweta singh News, BJP Latest Marathi News
Shweta singh News, BJP Latest Marathi Newssarkarnama

बांदा (उत्तरप्रदेश) : मृत्यूच्या वीस तास आधी त्यांनी फेसबूक पोस्टद्वारे आपल्या मनातल्या गोष्टी व्यक्त केल्या अन् स्वतःचं आयुष्य संपवलं. उत्तर प्रदेशातील बांदा येथे भाजपच्या (bjp) नेत्यानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

निवृ्त्त सनदी अधिकारी,आणि भाजपच्या (bjp) जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या श्वेता सिंह गौर (वय ३५) यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी त्यांनी राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (BJP Latest Marathi News)

"मी एक अपमानीत महिला, आणि जखमी वाघिण आहे," असे त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.पती-पत्नी हे दोघेही भाजपशी संबंधित आहेत.

श्वेता सिंह गौर (shweta singh) यांचे पती दीपक सिंह गौर हेही भाजपचे नेता आहेत. ते सध्या फरार आहेत. त्यांचा फोनही बंद आहे.बांदाचे पोलीस आयुक्त अभिनंदन यांनी सांगितले की, दीपक सिंह गौर यांचा तपास सुरु आहे. श्वेता यांनी आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शी दिसते," स्थानिक पोलिसांनी देखील घटनेचा तपास तात्काळ सुरू केला आहे. या घटनेमागचे कारण पती-पत्नीमधील वाद आणि दुरावा असल्याचे सांगितले जात आहे.

Shweta singh News, BJP Latest Marathi News
कोरेगाव-भीमा प्रकरण : शरद पवारांची ५ मे रोजी होणार साक्ष

श्वेता सिंह या भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा होत्या.त्या जसपुरा येथून पंचायत समितीच्या सदस्यांमधून निवडून आल्या होत्या. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. श्वेता याचे सासरे राज बहादुर सिंह हे रिटायर्ड आयपीएस (IPS) ऑफिसर आहेत. श्वेता सिंह यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, असा संशय काही जणांनी व्यक्त केला आहे.

Shweta singh News, BJP Latest Marathi News
विश्वजित कदम, देशमुख यांना त्यांच्या धोरणाने चालू द्या..पण आम्ही आमचं ठरवलयं!

"अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये काही गोष्टींवरुन भांडण सुरू होते, काल (बुधवारी) रात्रीही या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. ज्यानंतर श्वेता सिंहने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली,"असे पोलिसांनी सांगितले.

श्वेता सिंह गौर आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात..

  • जीवन बांसुरी की तरह है, इसमें बाधा रूपी जितने भी छेद क्यों न हो, जिसे उसे बजाना आ गया, उसे जीवन जीना भी आ गया.

  • घायल नागिन, घायल शेरनी और अपमानित स्त्री से हमेशा डरना चाहिए’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com