अब बग्गा का बाप है! भाजप नेत्याच्या वडिलांचं केजरीवालांना आव्हान

तेजिंदरसिंग पाल बग्गा यांना पंजाब पोलिसांनी अटक केल्यानंतर दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.
Arvind Kejriwal and Preetpal Singh Bagga
Arvind Kejriwal and Preetpal Singh BaggaSarkarnama

नवी दिल्ली : भाजपचे (BJP) नेते तेजिंदरसिंग पाल बग्गा (Tajinder Pal Singh Bagga) यांना पंजाब पोलिसांनी अटक केल्यानंतर दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग यांच्या तक्रारीवरून पंजाब पोलिसांविरूध्द दिल्ली पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता प्रीतपाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनाच आव्हान दिलं आहे. (Tajinder Pal Singh Bagga latest News Update)

प्रीतपाल यांनी पंजाब पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसानी घरी आल्यानंतर आपल्या मुलाला मारहाण केली. तसेच माझ्या तोंडावरही मारले. त्यांनी मुलाला पगडीही बांधू दिली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी तक्रारीनंतर तातडीने पावले उचलल्याने आपल्या मुलाला वाचवता आले, असं म्हणत बग्गा यांनी दिल्ली पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, बग्गा यांनी माध्यमांशी बोलताना केजरीवाल यांना थेट आव्हान दिलं आहे. (Delhi CM Arvind Kejriwal Latest Marathi News)

Arvind Kejriwal and Preetpal Singh Bagga
भाजपच्या एका नेत्यासाठी तीन राज्यांचे पोलीस आमनेसामने; तब्बल सात तास 'भागमभाग'

माध्यमांशी बोलताना प्रीतपाल बग्गा म्हणाले, 'आतापर्यंत तेजिंदर बग्गा होता, आता बग्गाचा बापही आहे.' तेजिंदर हे सातत्याने आपला लक्ष्य करत होते. आता त्यांच्या वडिलांनीही केजरीवालांविरोधात आघाडी उघडण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, बग्गा यांना अटक केल्यानंतर भाजपने केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दिल्लीत आपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले जात आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून आपकडून भाजपच्या नेत्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

दिवसभरात काय घडलं?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पंजाबचे पोलीस दिल्लीतील जनकपुरी येथील बग्गा यांच्या घरी सकाळी सव्वा आठ वाजता पोहचले. बग्गा यांना अटक करून पंजाबचे पोलीस मोहालीच्या दिशेने निघाले होते. परंतु बग्गा यांना अटक केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामध्ये मग दिल्ली व हरयाणा पोलिसांची एन्ट्री झाली. बग्गा यांच्या वडिलांनी मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी पंजाब पोलीस कर्मचाऱ्यांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सांगण्यावरून हरयाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या बग्गा यांना घेऊन जाणाऱ्या गाड्या कुरुक्षेत्रमध्ये अडवल्या. यादरम्यान हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांना आपण बग्गा यांना दिल्ली पोलिसांकडे सोपवणार असल्याचे जाहीर केले.

Arvind Kejriwal and Preetpal Singh Bagga
ठाकरे सरकारला मोठा दिलासा; बहुसदस्यीय प्रभाग रचनेवर न्यायालयाची मोहोर

पंजाब पोलिसांच्या विनंतीनंतरही हरयाणा पोलिसांना त्यांना जाऊ दिले नाही. पंजाब पोलिसांनी हरयाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यासोबत एफआयआरची कॉपीही जोडली. हे अपहरणाचे प्रकरण नाही. हरयाणा पोलिसांनी विनाकारण अडवले आहे, असा दावा पंजाब पोलिसांनी पत्रात केला. पण त्यानंतर हरयाणा पोलिसांनी त्यांना सोडले नाही. यावेळी दिल्लीचे पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी बग्गा यांना आपल्या ताब्यात घेऊन दिल्लीला नेले. सुमारे सात तास हा घटनाक्रम सुरू होता.

बग्गा यांच्याविरोधात आपचे नेते सनी सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून पंजाब पोलीस बग्गा यांच्या शोधात होती. याआधीही पोलीस दिल्लीत आले होते. पण त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. बग्गा यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. केजरीवाल हे काश्मीरी पंडितांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com