दारूण पराभव होऊनही भाजपच्या बड्या नेत्यानं मानले निवडणूक आयोगाचे आभार

सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
BJP

BJP

Sarkarnama

कोलकता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) कोलकता महापालिकेच्या (Kolkata Municipal Corporation) निवडणुकीत भाजपचा (BJP) दारूण पराभव झाला आहे. भाजपला 144 पैकी केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) 134 जागा मिळवत विरोधकांचा सुफडा साफ केला आहे. डावे पक्ष व काँग्रेसचीही (Congress) धूळधाण उडाली आहे. या दारूण पराभवानंतर भाजपच्या बड्या नेत्यानं थेट राज्य निवडणूक आयोगाचे (State Election Commission) भाजपचे आभार मानले आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी ट्विट करून राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सौरव दास यांना टोला लगावत अभिनंदन केले आहे. सुवेंदू यांनी ट्विटमध्ये तृणमूलसह भाजप, काँग्रेस व इतर पक्षांना कोलकाता महापालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या जागांची माहिती दिली आहे. त्याआधी त्यांनी म्हटले आहे की, बंगालच्या रॉयल भाच्याचा अंदाज खरा करून दाखवल्याबद्ल सौवर दास यांचे अभिनंदन.

<div class="paragraphs"><p>BJP</p></div>
महापालिका निवडणुकीत काँग्रेससह भाजपची धूळधाण

सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा एक व्हिडीओही ट्विट केला आहे. निवडणूक आयोगाने महत्वाची पावले उचलली. जसे की, व्हीव्हीपॅट शिवाय ईव्हीएम, कनेक्शनशिवाय सीसीटीव्ही आणि कोलकाता पोलिसांच्या मदतीने भीतीचे वातावरण तयार केल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे. तसेच त्यांनी तुम्ही केलेल्या कष्टाबद्दल मिळणाऱ्या बंग भूषण पुरस्काराबद्दलही आधीच अभिनंदन करतो, असा टोलाही सुवेंदू यांनी लगावला आहे.

मतदान झाल्यानंतर सुवेंदू यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आंदोलन केले होते. निवडणुकीत तृणमूलमध्ये मोठा घोळ केल्याने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. सत्तेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण आयोगाकडून ही मागणी फेटाळण्यात आली होती. त्यामुळे सुवेंदू यांनी ट्विट करून असे आरोप केले आहेत.

<div class="paragraphs"><p>BJP</p></div>
काँग्रेसची पडझड सुरू; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसने पुन्हा बाजी मारली आहे. कोलकाता महापालिकेच्या निवडणुकीत तृणमूलने 144 पैकी 134 जागा जिंकत भाजपसह काँग्रेस व डाव्यांची दाणादाण उडवली आहे. तीनही पक्षांना दुहेरी आकडाही पार करता आलेला नाही. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. कोलकाता महापालिकेच्या 144 जागांसाठी 19 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने अनेक ठिकाणी आघाडी घेतल्याचा कल होता. हा कल शेवटपर्यंत कायम राहिला. तृणमुलने 144 पैकी 134 जागा जिंकल्या असून मागील निवडणुकीपेक्षा दहा जागा अधिक मिळवल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ममतांना बंगालमध्ये मिळालेला हा सलग दुसरा मोठा विजय आहे.

2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत टीएमसीला 124 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपच्या पदरात केवळ पाच जागा पडल्या होत्या. तसेच डाव्यांनाही पाचच जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजप व डाव्यांना मागील आकडाही टिकवता आला नाही. भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या असून डावे पक्ष व काँग्रेसला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. इतरांनी तीन जागा मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com