साध्या वेशातील पोलिसांकडून भाजपच्या 8 ते 10 आमदारांना मारहाण; विरोधी पक्षनेत्यांचा दावा

सत्ताधारी आणि भाजपच्या आमदारांमध्ये आज हाणामारी होऊन गोंधळ उडाला.
BJP
BJPSarkarnama

कोलकता : पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपचे आमदार सभागृहात आमनेसामने आले. आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्यासोबत हाणामारी केल्याचा प्रकार घडला. यानंतर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी सरकावर गंभीर आरोप केला आहे. साध्या वेशातील पोलिसांनी सभागृहात घुसून भाजपच्या 8 ते 10 आमदारांना मारहाण केल्याचा दावा अधिकारींनी केला आहे.

आमदार सभागृहातही सुरक्षित नसल्याचा दावा करुन सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) म्हणाले की, राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी आम्ही विधानसभेत चर्चा करण्याची मागणी केली होती. सरकारने आमची मागणी फेटाळून लावली. याचवेळी आम्हाला रोखण्यासाठी सरकारने साध्या वेशातील कोलकता पोलिसांना सभागृहात आणण्यात आले. आमच्या 8 ते 10 आमदारांना सभागृहातच मारहाण करण्यात आली. यात आमचे मुख्य प्रतोद मनोज तिग्गा यांचाही समावेश आहे. यामुळे आमदार आता विधानसभेत सुरक्षित नसल्याचे सिद्ध झाले आहे.

BJP
सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये हाणामारी! विरोधी पक्षनेत्यांसह भाजपचे पाच आमदार निलंबित

वीरभूममधील हिंसाचारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचे समोर आले असून, या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी भाजप (BJP) आमदारांनी आज लावून धरली. यामुळे विधानसभेत गोंधळ उडाला. यावर तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदारही आक्रमक झाले. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये हाणामारी सुरू झाली. हा प्रकार रोखण्यासाठी अखेर मार्शल आणि पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. यात तृणमूलचे आमदार असित मुजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

BJP
राजकारण तापलं! मुख्यमंत्र्यांवर टीका अन् भाजपचे तीन आमदार झाले निलंबित

वीरभूममध्ये नेमकं काय घडलं?

रामपूरहाट जवळील बोगटुई गावात जमावाने काही घरांना आग लावली होती. घरांना बाहेरुन कड्या लावून ही आग लावण्यात आली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 5 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. ही घटना 22 मार्चला घडली होती. तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते भादू शेख यांची गावठी बॉम्बने हल्ला करून हत्या झाली होती. याचा सूड उगवण्यासाठी रामपूरहाटमध्ये हिंसाचार करण्यात आल्याचे समोर येत आहे. या हिंसाचारात ठार झालेले सर्व एकाच कुटुंबातील होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com