अमित शहा अडचणीत? भाजपच्या बड्या नेत्यानंच केली राजीनाम्याची मागणी

गृह मंत्रालय काढून घेऊन क्रीडा मंत्रालय देण्याचा सल्ला
अमित शहा अडचणीत? भाजपच्या बड्या नेत्यानंच केली राजीनाम्याची मागणी
Narendra Modi News, Amit Shah News in Marathi, Political NewsSarkarnama

नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पंडित आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाला लक्ष्य करून दहशतवाद्यांकडून हल्ले होच आहेत. यामुळे खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे. यातच सरकारी कर्मचारी आणि अन्य समाज घटकांनी काश्मीर खोरे सोडायला सुरूवात केली आहे. काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर चालल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानंच अडचणीत आणलं आहे. (Amit Shah News in Marathi)

भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी यावरून मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी थेट अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट आहे. असे असतानाही दररोज तिथे काश्मिरी पंडितांची हत्या सुरू आहे. त्यामुळं अमित शहांचा राजीनामा घेणं हे गरजेचं आहे. त्याऐवजी शहांना क्रीडा मंत्रालय द्यावे. असेही आता क्रिकेटला अनावश्यक महत्व दिले जात आहे.

Narendra Modi News, Amit Shah News in Marathi, Political News
काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर? अजित दोवाल तातडीनं अमित शहांच्या भेटीला

नॉर्थ ब्लॉक येथे काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल (Ajit Doval) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अमित शहांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह हे या वेळी उपस्थित होते. मागील काही दिवसांत दहशतवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे काश्‍मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काश्मीरमधील सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

मागील १५ दिवसांत दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांचा गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या हल्ल्यांमुळे काश्मीर खोऱ्यातील हिंदू दहशतीखाली आहेत. ते हे खोरे सोडून पलायन करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. आज (ता.३) याच विषयावर दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होणार आहे. यात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा सहभागी होणार आहेत.

Narendra Modi News, Amit Shah News in Marathi, Political News
मुख्यमंत्र्यांची खुर्ची अखेर वाचली! विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय

बँक व्यवस्थापकाची हत्या

दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना ताजी आहे. दहशवाद्यांनी 31 मे रोजी जम्मू-काश्‍मीरच्या सांबा जिल्ह्यात कुलगाम येथे एका शिक्षिकेसह तिघांची हत्या केली होती. त्याआधी १८ मे रोजी उत्तर काश्‍मीरच्या बारामुल्ला येथील दारूच्या दुकानावर ग्रेनेड फेकण्यात आले होते. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पोलीस कॉन्स्टेबल सेफुला कादरी, टीव्ही कलाकार अमरीन भट्टचीही हत्या करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in